वासुदेव देसले कोपरगाव शहराचे नवे पोलीस निरीक्षक.
पो.नि. हर्षवर्धन गवळी यांची शिर्डीला बदली
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी -- कोपरगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे
नुकतीच काही महिन्यापूर्वी शहर पोलीस स्टेशन ला रुजू झालेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची शिर्डी साई मंदिराच्या सुरक्षा विभागात बदली झाली असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन ला साई मंदिर सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची नेमणूक झाली आहे. सध्या शहरात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने रुजू होणारे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची नेमणूक झाल्याची चर्चा सध्या शहरांमध्ये सुरू आहे.
0 Comments