साडेचार हजारांची लाच घेताना वीज वितरण कंपनीचा लाईनमन लाच लुचपत च्या जाळ्यात.
![]() |
![]() |
राहाता प्रतिनिधी:-----नवीन कनेक्शन चे विद्युत जोडणी लवकरात लवकर बसून मीटर बसवण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लोणी -२ तालुका राहाता अस्तगाव रोड निर्मळ प्रिम्पी येथील विजय वितरण कंपनीच्या सहाय्यक तंत्रज्ञ ( असिस्टंट लाईनमन)नवनाथ नामदेव निर्मळ वय ४३ याला नगर येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की राहाता तालुक्यातील आंबेगाव खुर्द या ठिकाणी राहणाऱ्या तक्रारदार यांच्या घरात नवीन वीज कनेक्शन घेतले होते सदर वीज कनेक्शन लवकर व त्याला मीटर बसवण्यासाठी आरोपी नवनाथ नामदेव निर्मळ याने तक्रारदार यांच्याकडे साडेचार हजार रुपयांची लाच मागितली होती यावर तक्रार येणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याशी संपर्क केला यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून दिनांक सोमवार ८ फेब्रुवारी रोजी लोणी येथील हॉटेल साई छत्र याठिकाणी आरोपी नवनाथ निर्मळ याला साडेचार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले असून कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस हवालदार तन्वीर शेख पो.ना.प्रशांत जाधव, पो.ना. चौधरी, विजय गंगुल,पो.शि.रविद्र निमसे, वैभव पांढरे ,मपोशि राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पो ह. हरुण शेख अहमदनगर यांनी केली आहे.
0 Comments