कोपरगावात लायन्स डायलिसिस सेंटर चे उदघाटन
लायन्स क्लबच्या अभिनव उपक्रमाने गरजूंना होणार मदत.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी ------ लायन्स क्लब कोपरगाव च्या वतीने संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे सवलतीच्या दरात अत्यन्त उपयोगी अशा डायलिसिस सेंटर ची सुविधा उपलब्ध झाली असून त्याचा उदघाटन सोहळा , लायन्स क्लब चे प्रांतपाल ला.श्री.अभय शास्त्री यांचे शुभ हस्ते मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सम्पन्न होणार असल्याचे , लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष ला.सत्येन मुंदडा , क्लब अध्यक्ष ला.सुधीर डागा व जनार्दन स्वामी हॉस्पिटल चे ला.प्रसाद कातकडे यांनी दिली .या सुविधेमुळे परिसरातील डायलिलीस घ्याव्या लागणाऱ्या रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळणार असून मोठ्या शहरात जाऊन उपचार घेण्यामुळे होणाऱ्या शारिरीक , आर्थिक , मानसिक त्रासातून रुग्ण व नागरिकांना दिलासा मिळणार आहे
लायन्स क्लब कोपरगाव चे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून गेल्या पन्नास वर्षात , लायन्स मूकबधिर विद्यालय , लायन्स पार्क , लायन्स हॉल , नाईट स्कुल , रुग्णउपयोगी साहित्य केंद्र , अमर धाम येथे सोलर हिटर , शवपेटी , गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका , जयपूर फूट ,आरोग्य शिबिरे , लायन्स एक्स्पो या सारख्या अनेक सेवाभावी कार्ये कायमस्वरूपी चालत असून क्लब सामाजिक सेवा कार्ये करण्यास नेहमीच तत्पर असते.
लायन्सच्या सेवाकार्यात ला.तुलसीदास खुबाणी, राजेश ठोले, संदीप कोयटे, संदीप रोहमारे, अभिजित आचार्य , डॉ.संजय उंबरकर, राम थोरे, सुरेश शिंदे व सर्व लायन्स ,लायनेस व लिवो सदस्यांचे मोठे योगदान आहे.
0 Comments