अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.
![]() |
![]() |
राहाता प्रतिनिधी :----- तालुक्यातील सावळीविहीर बु येथील स्नेहल अजित पवार वय १६ या अल्पवयीन मुलीने ओढणी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक ४फेब्रुवारी रोजी घडली या घटनेने सावळी विहीर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सदर कुटुंब हे गरीब असून मुलीचे आई वडील मोल मजुरी साठी बाहेर गेले होते घरी मोठी बहीण व लहान भाऊ होता ते बाहेर गेले असता स्नेहल ने गळफास घेऊन आत्महत्या केली लहान भाऊ घरात आला असतां त्याने ही घटना बघितल्यावर तात्काळ शेजारच्या लोकांना ही घटना सांगितली पोलिस पाटील सुरेश वाघमारे बाजार समिती चे उप सभापती बाळासाहेब जपे यांनी शिर्डी पोलीस स्टेशन ला खबर दिली शिर्डी पोलिसांनी घटना्थळी भेट देऊन पाहणी केली तिच्या मृत्यूदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांचे ताब्यात देण्यात आला शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे तिने आत्महत्या साठी मोठे टोकाचे पाऊल का उचलले याचाही तपास शिर्डी पोलीस करीत आहे ह्या घटनेने मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments