आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कामगारांच्या प्रश्नावर मौन धरणाऱ्या नेत्यांना कामगार माफ करणार नाही. संचालक विठ्ठल पवार.

 कामगारांच्या प्रश्नावर मौन धरणाऱ्या नेत्यांना  कामगार माफ करणार नाही.

   संचालक विठ्ठल पवार.
शिर्डी प्रतिनिधी :----- कामगार नेते  साईबाबा संस्थांच्या  सामान्य कामगारांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असताना   त्याकडे दुर्लक्ष्य करून वरीष्ठ अधिकाऱ्यांना खुश  करण्यासाठी प्रयत्न  करताना दिसुन येत असल्याने साईबाबा संस्थान कामगारांचा भ्रमनिरास झाला. कामगार योग्य वेळी चोख उत्तर देतील असे मत कामगार नेते व साई एम्प्लॉईज सोसायटी चे संचालक विठ्ठल पवार यांनी केला आहे

कामगारांना त्रास दिला जात असताना   विना चौकशी न करता साईबाबा संस्थान मध्ये  निर्णय घेतले जातात दोन प्रभारी खातेप्रमुखावरील कारवाई तसेच निंलबन कारवाई,  हाँस्पिटल मधील ब्रदरला नातेवाईकांनी केलेली  मारहाण प्रकरण  आपण पकडलेले मौन कामगार विरोधी नाही का?असा सवाल करून५९८ कामगारांच्या आँडरचा विषय कंत्राटी शब्दाचा घोळ केला गेला त्याची किंमत निष्पाप कामगारांना मोजावी लागली  ,कंत्राटी कामगारांना ४०% वेतन कपात , प्रलंबित अनुकंपाचा विषय, हाँस्पिटलमधील सिस्टर इनचार्ज विषय , शासन नियमानुसार बदल्या ,३० ते ३४ वर्षे मदतनीस पदावर असतांना आजही मदतनिस पदावर सेवानिवृत्त झाले   मुकादम सुपरवायझर केल नाही तेंव्हा कुठ होता तुम्ही हा कामगारांचा प्रश्न आहे

 ज्या साठी संघर्ष  केला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष हा अन्याय नाही का बिंदुनामावली आक्रतीबंध मागासवर्गीय कक्ष हे फक्त कागदोपत्रीच आहे  इथ ज्याचा वशीला तो काशीला असाच प्रकार राजरोसपणे सुरू असताना आपल्या फायद्यासाठी पकडलेल्या मौनाची किंमत कामगार योग्य वेळी देतील यांचा विसर कामगार नेते म्हणणारे लोकांना कसा पडला हे देखील बरेच काही सांगून जाते  किती प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला किती लोकांना न्याय दिला

 यांचे आत्मचिंतन करणार कि नाही हाच खरा प्रश्न उभा राहिला आहे  दिवाळी बोनसग्रँज्युटीचा प्रलंबित विषय शताब्दीभेटविषय,कामगारांना पार्किंग, गणवेश नाही ,१०,२०,३० वर्षे झाली  कालबाह्य पदोन्नती नाही, शैक्षणिक पात्रता असतांना १०५२ मधील कामगारांना पदनाम पदोन्नती नाही तेंव्हा कुठ होता तुम्ही 

 प्रभारी पदावर नियुक्त्या पात्रता नसतांना कोणाला मिळाल्या  हे कामगारांना माहिती नाही असे समजु नका नेते तुपाशी...सामान्य कामगार मात्र उपाशीअशी अवस्था झाली आहे याची किंमत ज्या कामगारांना त्रास झाला न्याय मिळाला नाही ते योग्य वेळी देतील असा विश्वास देखील साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी चे संचालक विठ्ठल पवार यांनी व्यक्त केला आहे.


Post a Comment

0 Comments