Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

तालुक्यातील रवंदे रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या पिकप ने पादचाऱ्यास दिली धडक, गुन्हा दाखल.

  तालुक्यातील रवंदे रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या पिकप ने पादचाऱ्यास दिली धडक, गुन्हा दाखल.कोपरगाव प्रतिनिधी :---- भरधाव वेगाने पिकअप चालवून पादचाऱ्याला उडविण्याची घटना कोपरगाव तालुक्यातील रवंदे रस्त्यावर  दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली असून पिकप चालकाविरुद्ध  द 23 फेब्रुवारी रोजी  उशिरा  तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी बाबासाहेब फक्कडराव आदमाने वय 42 वर्षे राहणार मळेगाव  थडी यांचे वडील फक्कडराव आदमाने वय 65 वर्षे राहणार मळेगाव थडी हे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी रवंदे रस्त्यावरून पायी जात असताना मागून आलेल्या पिकप क्रमांक एम एच 15 एफ व्ही 8908 याने भरधाव वेगाने धडक दिल्याने फक्कडराव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, दरम्यान फक्कडराव यांच्या मुलाने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 64 / 21 भारतीय दंड विधान कलम 279 337 338 मोटार वाहन कायदा कलम 184 134 (अ)(ब)प्रमाणे पिकपच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रदीप काशीद हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments