आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शेतकरी बांधवांवर वीज तोडणीचे संकट असतांना तालुक्याचे आमदार कुंभकर्णाच्या झोपेत आहेत का ? ----साहेबराव रोहोम.

  शेतकरी बांधवांवर वीज तोडणीचे संकट असतांना तालुक्याचे आमदार कुंभकर्णाच्या झोपेत आहेत का ? ----साहेबराव रोहोम.

वीज तोडणी केल्यास जनआंदोलन उभे करु साहेबराव रोहोम यांचा इशारा  
कोपरगांव प्रतिनिधी ----- तालुक्यासह, मतदारसंघातील शेतक-यांचा कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्याची कुठलेही पूर्व सुचना न देता वीज तोडणी मोेहीम वीज वितरण कंपनीने सुरु केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला असतांना देखील तालुक्याचे आमदार कुंभकर्णाच्या झोपेत आहेत का ?. वितरण कंपनीने सदरची मोहिम त्वरीत थांबवावी अन्यथा जन आंदोलन उभे करुन जसे चे तसे उत्तर देवु असा इशारा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला आहेत. 
कोरोना या विषाणु मुळे सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि शेतक-यांची पण हीच परिस्थिती आहेत. कोरोनाच्या कालावधीत लाईट बील वाढीव आले त्यात शेतक-यांना, शेतमजुर, सर्वसामान्य नागरिकांना देखील अव्वाच्या सव्वा बिले दिल्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-यांना अनेक समस्यांना, संकटाला सामोरे जावे लागत आहे. 
थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची विज तोडणी थांबविण्यासाठी विद्यामान आमदारांनी पुढाकार घेण्याची गरज असतांना देखील त्यांनी या विषयाकडे पाठ फिरवुन आपल्या नेहमीप्रमाणे फोटो सेशन मध्ये मग्न झाले आहेत. वीज वितरण कंपनी बरोबर विद्यामान आमदारांना देखील कंभकर्णाच्या झोपेतुन बाहेर काढावे लागणार आहेत. सत्ताधारी सरकार मध्ये राहुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडु शकत नाही त्या सरकारचा आणि आमदाराचा का उपयोग ?. दरम्यान, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळं संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. संपूर्ण देशात शेती हा एकमेव व्यवसाय सुरू होता. कठीण काळात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन देशाला अन्नधान्याचा पुरवठा केला हे राज्यसरकार विसरलेले आहेत. जगाचा पोशिंदा वर अन्याय न करता त्यांना न्याय द्या त्याचबरोबर वीज तोडणी त्वरीत थांबवुन शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावे अशी मागणी देखील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments