सहा हजाराची लाच घेताना महिला तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
राहता तालुक्यात खळबळ.
![]() |
राहता प्रतिनिधी :------ राहता तालुक्यात पंधरा दिवसात दोन पोलीस एक वायरमन लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असताना अजूनही सेवकांमध्ये लाच मागण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येते. यात महिलाही मागे नाहीत हे जणू काही नऊ फेब्रुवारी रोजी दिसून आले. राहता तालुक्यातील येथील महिला तलाठी स्वाती गौतम मेश्राम वय 37 यांनी खडकेवाके हद्दीतील वडील व चुलत्याच्या नावे असलेली जमीणीचे वाटणी पत्र हक्क सोडपत्र या आधारे नोंद करुन फेरफार देण्यासाठी या महिला तलाठी ने सात हजार रुपयांची मागणी केली होती मात्र तक्रारदार याची लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी नगर येथील लाचलुचपत विभागाची संपर्क साधला होता. त्याआधारे लाचलुचपत विभागाचे नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील पोलिस निरीक्षक शाम पवरे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला असता केलवड येथील तलाठी कार्यालयात महिला स्वाती मेश्राम तलाठी हिने सहा हजार रुपयांची रक्कम घेत असताना लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकल्याने राहता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसात जवळपास चार लोकसेवक लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केल्याने सामान्य जनतेत समाधानाचे वातावरण पसरले असून राहता तालुक्यात काही लोक सेवकांना मोठ्या प्रमाणावर पैशाची चटक लागली असल्याचे दिसून येत असून यात महिला लोकसेवक सुध्दा काही मागे नाही हेच जणूकाही या कारवाईमुळे अधोरेखित झाले आहे. राहता तालुक्यात अनेक शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर लोकांची पैशासाठी कामे रखडुन रोखून धरली जात असून यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे पंधरा दिवसात चार लोकसेवक राहता तालुक्यात पकडले जात असल्याने बेकायदेशीर पद्धतीने लोकांचे शोषण कशा प्रकारे केले जाते हेच या घटनेतून पुढे आले आहे.
0 Comments