हिंगणी येथे चोरटी वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला,साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :------- तालुक्यातील हिंगणी डाऊच रस्त्यावरून गोदावरी नदी पत्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा डंपर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला असून आरोपी अजीज शहानुर सय्यद याच्याविरुद्ध आज दि 24 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आले असून डंपर सह साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सध्या वाळू उपसा बंद असताना देखील 23 फेब्रुवारीच्या रात्री हिंगणी शिवारातून रात्रीच्या वेळेस गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असण्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना मिळल्यानंतर त्यांनी सदर कारवाई केली असून तालुका पोलीस ठाण्यात आज रोजी आरोपी अजीज शानुर सय्यद रा पंधराचारी ता राहता याच्या विरुद्ध गु र नंबर66/21 भादवी कलम 379 सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम 3,15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नि दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फौ महेश कुसारे करीत आहे.
0 Comments