Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

गरिबीचा संघर्ष अखेर मृत्यू ने थांबला. केबल अंगावर पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

 गरिबीचा संघर्ष अखेर मृत्यू ने थांबला.

केबल अंगावर पडल्याने  महिलेचा दुर्दैवी मृत्यू.
शिर्डी प्रतिनिधी :----
शिर्डी नजीक निमगाव कोराळे  हद्दीत असलेल्या हेलिपॅड रोडनजीक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात घरची गरीबी असल्याने जाळण्यासाठी लाकूड व फळ्या काढण्याच्या तयारीत असतांना जवळच असलेल्या गोलाकार असलेल्या लाकडी केबल गुंडाळलेल्या ठिकाणी त्या फळ्या काढतांना संपूर्ण शेकडो किलो वजनाची केबल अंगावर पडून ललिता बाबासाहेब पवार वय - ४५ या गरीब महिलेचा बुधवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने  गरिबीचा संघर्ष मृत्यू ने थांबला अशीच काहीशी घटना निमगाव कोराळे  परिसरात भर दिवसा घडल्याने  हळहळ व्यक्त केली जात आहे.अधिक माहिती अशी की दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही महिला आणि तिचा मानलेला निराधार लहान  आठ वर्षाचा मुलगा  सौरभला बरोबर घेऊन दोघे जण  केबलच्या लाकडी फळ्या काढण्याचा प्रयत्न करीत होते  ,अचानक अवजड वजनाची ही इलेक्ट्रॉनिक केबल तिच्या अंगावर पडल्याने ही महिला त्याखाली दबली गेली ,ह्या मुलाने तिला काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही त्यांनतर सामाजिक कार्यकर्ते पोपट शिंदे ,शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते अविनाश मकासरे चांगदेव जगताप बंटी ठाकरे  व शिर्डी पोलीस पथकाने तात्काळ जेसीबीच्या साह्याने तिला बाहेर काढले अधिक औषध उपचारासाठी शिर्डी पोलीस साईबाबा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारीनी तिला मृत घोषित केले .मयत महिलेला वयोवृद्ध आई असून एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.घरची गरिबी असतांनाही तिने एका निराधार आठ वर्षाच्या मुलाला आधार देऊन त्याला सांभाळत होती .निराधार असलेला मुलगा सौरभच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्याने ह्या मुलाला मोठे दुःख झाले होते.याबाबत उशिरापर्यंत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्याचे काम सुरू होते.या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे.


Post a Comment

0 Comments