शिवसेनेने सोडले मोकाट कुत्रे नगरपंचायत मध्ये सोडून अनोखे आंदोलन.
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी:---- शिर्डी नगरपंचायतीच्या कार्यालयात शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर वाढलेल्या मोकाट कुत्र्यांमुळे ग्रामस्थ व साई भक्तांना मोठा त्रास होत असल्याने यावर तात्काळ कारवाई केली जावी यासाठीशिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी थेट नगरपंचायतीच्या आवारात कुत्रे सोडून नगरपंचायतीच्या प्रशासनाची लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याने या अनोख्या आंदोलनाची चर्चा दिवसभर शिर्डी शहरात सुरुवात
शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर नगरपंचायती ला कराच्या रूपात कोट्यवधी रुपये जमा होत असताना मात्र आरोग्याच्या प्रश्नावर नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्याने व शहरात मोकाट कुत्रे डुकरांचे वाढते साम्राज्य याकडे लक्ष वेधण्यासाठी व नगरपंचायतीने कठोर कारवाई करावी यासाठी आपण अशा प्रकारचे आंदोलन सुरू केले असून ग्रामस्थांनी व कार्यकर्ते या ठिकाणी अशा प्रकारची कुत्रे मांजरे डुकरे आणून सोडली तर त्यांना देखील आकर्षक स्वरूपात बक्षीस शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आल्याचे सांगितले साई मंदिर परिसरात तर मोठ्या प्रमाणावर असलेल्या कुत्र्यांना विविध रोगांची लागण झालेले आहे अशा कुत्र्यांना पकडण्याची जबाबदारी नगरपंचायतीचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते असा सवाल शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी विचारला आहे याबाबत मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना विचारले असता याबाबत कुत्रे पकडण्यासाठी शासकीय नियमात राहून योग्य ती कारवाई करण्यासाठी नगरपंचायत तात्काळ प्रयत्न करील असे सांगितले.
0 Comments