आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

इफकोच्या माध्यमातून गरीब व शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार.:--- विवेक कोल्हे.

 इफकोच्या माध्यमातून गरीब व शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार.:---  विवेक कोल्हे.




कोपरगाव प्रतिनिधी :---- शेतक-यांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम करणा-या इफको मार्फत गरीब शेतकरी कुटूंबाना विविध उपक्रमांचा लाभ मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन, इफकोचे जनरल बाॅडी प्रतिनिधी विवेक  कोल्हे यांनी केले.

इंडियन फार्मर्स फर्टीलायझर्स को आँँपरेटीव्ह लि., सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि शेतकरी सहकारी संघ, कोपरगाव यांच्या संयुक्त विदयमाने उस तोडणी कामगारांना श्री विवेक कोल्हे यांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी इफकोचे विभागीय व्यवस्थापक दिनेश देसाई, फिल्ड आँँफीसर तुषार गोरड, ईष्वर चोखर,  शेतकी अधिकारी जी बी शिंदे,उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, ज्ञानेष्वर गायकवाड यावेळी उपस्थित होते. यावेळी कोल्हे बोलत होते, ते पुढे म्हणाले, इफको या संस्थेमार्फत नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. उस तोडणी कामगार हे आपले गाव, कुटूंब सोडून दूरवर उस तोडणी येत असतात. उन, थंडी, पाउस कशाचीही तमा न करता हे कामगार रात्रंदिवस काम करीत असतात. त्यांना मायेची उब देण्याच्या भावनेतून इफकोच्या सहकार्याने ब्लॅंकेटचे वाटप करता आले. भविष्यातही इफकोच्या माध्यमातून गरीब शेतकरी कुटूंबांना विविध उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यास कटीबध्द राहू, अशी ग्वाही श्री कोल्हे यांनी  दिली.
यावेळी विभागीय व्यवस्थापक श्री देसाई म्हणाले, विवेक कोल्हे यांनी या भागातील गरजु शेतक-यांना इफकोच्या माध्यमातून मोठया प्रमाणात ड्रीप अनुदान मिळवुन दिले. गंभीर आजारी व्यक्ती, अपघातग्रस्त व्यक्तींना वैदयकिय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचे श्री देसाई म्हणाले. शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक हरिभाउ गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments