सक्तीची वीजबिल वसुली सहन करणार नाही.:----माजी आमदार स्नेहलता कोल्हे.
शेतकऱ्यांबाबत शरद पवारांचे धोरण राज्यात एक आणि देशात एक.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:-- १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा म्हणजे खोटे आश्वासन असून “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” आहे.
कोरोना काळात जनतेला वीज बिलमाफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहेत. थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार असंवेदनशील आहे. सक्तीने वीजबील वसुली करणाऱ्या या सरकारला आम्ही मनमानी करू देणार नाही.असा इशारा भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आंदोलन प्रसंगी दिला आहे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ५ रोजी मोर्चाने संपर्क कार्यालयापासून जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कोपरगाव येथे रस्त्यावर उतरून वीज वितरण कार्यालयासमोर भाजपच्यावतीने सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले, त्यावेळी सौ.कोल्हे बोलत होत्या. सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. आमचे राज्य असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीजजोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहिल्या होत्या. जर आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का कठीण आहे,असा सवालही सौ. कोल्हे यांनी केला. दिल्लीतील शेतकर्यांबद्दल कळवळा दाखविणारे व राज्यातील शेतकऱ्यांची वीज कट करणाऱ्या आघाडी सरकार म्हणजे ढोंगी सरकार असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांबाबत शरद पवारांचे धोरण राज्यात एक आणि देशात एक असे दुटप्पी धोरण आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील द्वेषापोटी शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधणारे हे कृत्य राजकीय षडयंत्र असून यामागे देश विघातक प्रवृत्ती आहेत. तर यापेक्षा यांना आपापले झेंडे आणि टेंबे मिळविण्याचे हे आंदोलन होते अशी टीकाही त्यांनी केली. ज्या मोदींनी सामान्य जनतेच्या चुलीपर्यंतचा विचार केला. महिलांच्या धूर मुक्तीसाठी घराघरात १०० रुपयात गॅस सिलेंडर पोहचवला, त्या मोदींना आज देशाच्या सीमेवर लढण्याबरोबरच घरातही लढावे लागते हे या देशाचे दुर्दैव आहे, आणि याच प्रवृत्तीचा मी येथे निषेध करते. सौ. कोल्हे म्हणाल्या, निळवंडे च्या पाण्याचा थेंबही कोपरगावला जाऊ देणार नाही असे जाहीर वक्तव्य ज्यांनी केले व कोर्टकचेऱ्या करून त्यांनीच कोपरगावचे पाणी घालवले, अशांच्या निवडणुकीतील खोट्यानाट्या थापानां शहरातील जनता फसली, आजही शहराला आठवड्यातून एकदाच पाणी आहे, दीड वर्षात साठवण तलावाच्या कामाव्यतिरिक्त यांनी काहीच केले नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
![]() |
0 Comments