आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

साईबाबा संस्थान ला पेड दर्शन व आरती माध्यमातून ४३कोटी १०लाख रुपये प्राप्त.

 साईबाबा संस्थान ला पेड दर्शन व आरती माध्यमातून ४३कोटी १०लाख रुपये प्राप्त.




शिर्डी(किशोर पाटणी) :------ श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या माध्यमातून शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात आरोग्य निवास याबरोबरच चांगल्या प्रकारचे दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न केला जातो. वर्षाकाठी शिर्डीत जवळपास काही कोटी भाविक देशासह परदेशातून येत असतात त्यातील अनेक भाविक भाविक पेड दर्शन पेड आरती ऑनलाइन ऑफलाइन यांच्या माध्यमातून देखील दर्शन व आरती पेड  माध्यमातून घेत असतात. याबाबत १जानेवारी १९ते१जानेवारी २०२० या कालावधीत किती लोकांनी दर्शन व पेड आरती  घेतली आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात  राहता येथील पत्रकार मुस्ताक  शहा यांनी माहिती मागितली असता साईबाबा संस्थान मध्ये दिवसभरात चार आरती होत असतात काकड आरती मध्यान आरती धूप आरती शेजआरती या बरोबरच पेड दर्शन माध्यमातून मोठ्या प्रमाणावर साईभक्तांनी प्रतिसाद दिल्यामुळे या माध्यमातून जवळपास ४३ कोटी १० लाख ६१ हजार ४०० रुपये साईबाबा  संस्थानला प्राप्त झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.  साईबाबा संस्थांच्या माध्यमातून साईबाबा सुपर हॉस्पिटल साईनाथ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून लाखो साई भक्तांवर चांगल्या पद्धतीने वैद्यकीय उपचार केले जात असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्याबरोबरच शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसाठी साईबाबा संस्थांच्या माध्यमातून मोफत भोजन  व्यवस्था  देखील अनेक वर्षापासून दिली जाते त्या बरोबरच चहा पाणी नाश्ता देखील अल्पदरात साईभक्तांसाठी दिला जातो या बरोबरच साई भक्तांना राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निवास सुविधा उपलब्ध असल्याने त्याचा देखील मोठ्या प्रमाणावर साईभक्तांना लाभ होत असतो निवासव्यवस्था चे साई मंदिर येण्या-जाण्यासाठी व्यवस्थादेखील साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून जवळपास पाचशे कोटी रुपये खर्चाच्या शैक्षणिक प्रकल्प व साई दर्शन प्रकल्प त्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.कमीत कमी वेळेत साईभक्तांना चांगल्या पद्धतीने दर्शन कमी वेळेत  मिळाले पाहिजे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी  कान्हुराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायोजना देखील सुरू आहेत हे करत असताना त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी देखील साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येते. देशभरातून येणाऱ्या साईभक्तांना साईच्या दर्शनानंतर मिळणारी मनशांती व पूर्ण होणाऱ्या मनोकामना यामुळे साई भक्तांची संख्या वाढत आहे तशीच ती पेड दर्शन व पेड आरती घेणाऱ्या साईभक्तांची देशात संख्या वाढत त्या बरोबरच बायोमेट्रिक पद्धतीने देखील साईभक्त दर्शन लाईन मध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने साईबाबा चे दर्शन घेत  आहे हेच यातून पुढे आले आहे काही दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी एक साईभक्त एक गाय या धरतीवर भव्य अशी गोशाळा उभी करण्याचा संकल्प केला होता याबरोबरच शिर्डी शहरात भव्य अशी कॅन्सर हॉस्पिटल वे करण्यासंदर्भात आपले नियोजन असल्याचे जाहीर केले होते ते काम लगतचच्या काळात लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे यासाठी तात्काळ सुरत होण्याची गरज असल्याची भावना साईभक्तांची आहे या अगोदर तात्कालीन कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या काळात दर्शन रांग व भव्य प्रकल्प उभे राहिले हे काम जरी प्रगतीपथावर असले तरी नवीन भव्य अशी प्रकल्प तातडीने मार्गी लागली पाहिजे यासाठी साईबाबा संस्थान काम केले पाहिजे अशी भावना साईभक्त बरोबरच ग्रामस्थांची देखील आहे.

Post a Comment

0 Comments