कोपरगाव पालिकेच्या मुख्य जलवाहिनीच्या व्हाँलला ट्रकच्या धडकेने मोठे नुकसान.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- संपूर्ण कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला ट्रक धडकल्याने जलवाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना गुरुवार 4 फेब्रुवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडली या धडकेमुळे जल वाहिनीवरील व्हाँँल व जलवाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच पालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या श्री पाटील मॅडम व व इतर अधिकारी व कर्मचारी यांची टीम तातडीने घटनास्थळी पाठवली याबाबत थोडक्यात माहिती अशी की शहराची मुख्य जलवाहिनी असलेली पाईपाला सकाळी आठच्या सुमारास साई धाम कमनी जवळील टिळेकर वस्ती समोर असलेल्या जलवाहिनीला शिर्डी कडून मालेगाव च्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक एम एच १८ बी.जे. ०२७७ ने जोरदार धडक दिली यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने जीवित हानी झालेली नाही मात्र या धडकेने जलवाहिनीचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा उशिराने होण्याची शक्यता आहे मात्र मुख्याधिकारी यांच्या सूचनेने पाणी पुरवठा विभागाची सर्व टीम युद्धपातळीवर सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम करत आहे. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या पाटील मॅडम म्हणाल्या की, जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून तरी नागरिकांनी सहकार्य करावे यावेळी पाणीपुरवठा विभागाचे इतर विभागातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते
0 Comments