आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या आडमुठेपणामुळे साडे आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता.

कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या आडमुठेपणामुळे

साडे आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता.

                





कोपरगाव प्रतिनिधी:------  नगरपरिषदेच्या-सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा एकदा बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत  बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासासाठी आलेला अंदाजे साडे आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता असून सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांकडून शहरविकासाला खीळ घातली जात असल्याचे राष्ट्रवादी-शिवेसना नगरसेवकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
यापूर्वी झालेल्या दोन स्थायी समितीच्या बैठकीत ज्या विकासकामांना मंजुरीसाठी ठेवण्यात आले त्या विकासकामांबाबत विकासाची मानसिकता नसलेल्या भाजपा नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून बहुमताच्या जोरावर बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून धन्यता मानली होती. मंगळवार (दि.१६) रोजी पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत  याबाबत सविस्तर चर्चा होवून शहरविकासाचा मार्ग मोकळा होईल अशी सर्वसामान्य कोपरगाव शहरवासीयांची अपेक्षा होती. यापूर्वी भाजपा नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची व शंकाची नगराध्यक्ष विजयराव वहाडणे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे यांनी सविस्तरपणे खुलासा करून देखील पुन्हा एकदा सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बांधकाम विभागाचे हे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासाशी देणंघेणं नसल्याचे दाखवून दिले आहे.


राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील सत्ताधारी भाजपा नगरसेवकांचे सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण देवून देखील केवळ कोपरगाव शहराच्या नागरिकांना वेठीस धरण्यासाठी राजकारण करीत असल्याचे दाखवून देवून कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी कोपरगाव शहरात वाटलेले पत्रक किती खोटे होते याचा देखील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत  पर्दाफाश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरेसवक संदीप वर्पे, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, शिवसेनेच्या सौ. सपना मोरे यांनी कोपरगाव शहराच्या बाबतीत पोटतिडकीने सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या मुद्यांचे स्पष्टीकरण देवून समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी आपली परंपरा कायम ठेवून बहुमताच्या जोरावर पुन्हा शहरविकासाला तिलांजली दिली असल्याचे राष्ट्रवादी-शिवेसना नगरसेवकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments