आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

डेमो हाऊसच्या संकल्पनेतून ड्रीम हाऊस :- आ. आशुतोष काळे. लाभाथ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे.

 डेमो हाऊसच्या संकल्पनेतून ड्रीम हाऊस :- आ. आशुतोष काळे. 

 लाभाथ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे.


कोपरगांव प्रतिनिधी:---- सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून महाविकास आघाडी सरकार अनेक समाजोपयोगी योजना राबवीत असून महाआवास अभियानाच्या माध्यमातून डेमो हाऊच्या संकल्पनेतून गरजू लाभार्थ्यांचे ड्रीम हाऊस साकारले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

 महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाआवास अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाचाच एक भाग डेमो हाऊस असून या अभियानांतर्गत कोपरगाव येथे पंचायत समितीच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या डेमो हाऊसचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, शासनाच्या वतीने घरकुलासाठी दिलेल्या अनुदानातून २७० स्केवर फुट जागेत कमी खर्चात सर्व सोयीयुक्त व सद्य भौगोलिक परिस्थितीनुसार कमीत कमी खर्चात कशा पद्धतीने घरकुल बांधले जावू शकते याची परिपूर्ण माहिती लाभार्थ्यांना मिळावी यासाठी ग्रामविकास खात्यामार्फत डेमो हाऊस संकल्पना राबविण्यात येत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानातून घरकुल पूर्ण करतांना लाभार्थ्याची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे या डेमो हाउसच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांच्या स्वप्नातील घराच्या स्वप्नपूर्तीसाठी हि संकल्पना अत्यंत फायदेशीर असून लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न डेमो हाउसच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ग्रामीण भागात जागेच्या मोठ्या अडचणी असतात. अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होते पंरतु स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुल मंजूर असूनही हे लाभार्थी घरकुलाचा लाभ घेऊ शकत नाही. त्यासाठी एका लाभार्थ्याच्या जागेवर २ ते ३ लाभार्थी बहुमजली घरकुल बांधू शकतात. सौभाग्य योजनेंतर्गत या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वीज कनेक्शन दिले जाणार असून या लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन देखील देण्यात येणार आहे. घरकुल प्रक्रियेत पंचायत समिती बरोबरच ग्रामपंचायत, राष्ट्रीयीकृत बँका, रोजगार हमी विभाग, महावितरण आदी विभागांचा समावेश आहे. जे लाभार्थी मिळणाऱ्या अनुदानामध्ये वैयक्तिक आर्थिक स्वरुपाची भर घालून मोठे घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न असेल व ते लाभार्थी राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज फेडण्यास सक्षम असतील तर अशा लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करून तातडीने पतपुरवठा करावा.कोपरगाव तालुक्यासाठी शबरी आवास योजना ८०, रमाई आवास योजनेंतर्गत २५९ व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १३३३ घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून या डेमो हाऊस संकल्पनेतून घरकुल उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधनेउपसभापती अर्जुन काळे,जी.प.सदस्य राजेश परजनेसदस्य सौ. अनुसयाताई होनअनिल कदममधुकर टेकेश्रावण आसने,रोहिदास होनराहुल रोहमारेराहुल जगधने,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पेधरमशेठ बागरेचानगरसेवक मंदार पहाडेराजेंद्र वाकचौरे,अजीज शेखगौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदारयुवक शहराध्यक्ष नवाज कुरेशीरमेश गवळीदिनकर खरेफकीरमामु कुरेशीराहुल देवळालीकरसागर लकारेनिलेश पाखरेसमिर वर्पे,इम्तियाज अत्तारउपगटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळेउपअभियंता उत्तम पवारतालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधातेविस्तार अधिकारी बबनराव वाघमोडेडी. ओ. रानमाळ आदी उपस्थित होते.

              

Post a Comment

0 Comments