सौ.पुष्पाताई काळे यांच्या हस्ते बचत गटाच्या महिलांना धनादेश वितरण.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ संचलित बचत गटांना मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते नुकतेच धनादेश वितरण करण्यात आले आहे.
बचत गटाच्या महिलांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांनी उभारलेल्या उद्योग-व्यवसायांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बँकांचे अर्थसहाय्य मिळवून दिले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्याने सहा लाख रुपयांचे धनादेश बचत गटाच्या महिलांना देण्यात आले असून प्रियदर्शनी महिला मंडळ संचलित शिवपार्वती महिला बचत गट टाकळी, शिवकन्या महिला बचत गट गजानननगर व राजेश्वरी महिला बचत गट गांधीनगर यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे प्रत्येकी १ लाख असे एकूण ३ लाख रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले आहे.
0 Comments