खराब नगर मनमाड रस्ताचा आठ दिवसांत दुसरा बळी
झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार, वीस वर्षीय तरुणाचा दुर्देवी अंत.
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी:------- नगर मनमाड रोड वर सावळीविहीर शिवारात दोडीया हाॅस्पिटल जवळ २३फेब्रुवारी रोजी तीन वाजेच्या सुमारास बहीणीला घेऊन दुचाकी वरून शिर्डीकडे येत असताना खराब खड्यात दुचाकीला कंटेनर क्रमाक आर जे१४ सी जे २६८७ यांच्या पाठीमागील चाका खाली सापडुन शिर्डी शहरातील राजगुरूनगर या परीसरातील २०वर्षाच्या रोशन राजेंद्र गुजर या तरुणाला जीव गमवावा लागला आहे आठ दिवसांत घडलेली दुसरी घटना आहे
खराब झालेल्या नगर मनमाड रोड वर अनेकांचा अपघातात बळी जात असताना प्रशासनाला मात्र यांचे फारसं गांभीर्यानं दखल घेण्याची गरज भासत नसल्याने नागरिकांन मध्ये नाराजीची भावना आहे
अधिक माहिती अशी की रोशन गुजर व त्यांच्या बहीणीला घेऊन वैजापूर येथुन शिर्डी कडे घेऊन येत होता अचानक सावळीविहीर येथे खराब झालेल्या खड्यात शेजारुन शिर्डी कडे येणाऱ्या कंटेनर खाली सापडुन जबर जखमी झाला शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण दातरे वैभव रुपवते पोलीस नाईक गणेश सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमीला वाचवण्यासाठी साईबाबा संस्थानच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले दुपारी शवविच्छेदन
करून मयताच्या वारसाकडे मृतदेह ताब्यात दिला आहे आठ दिवसांपूर्वी भागवत नावाच्या प्राध्यापक अपघातात बळी गेला असताना हि दुसरी दुर्घटना घडली आहे या घटनेनंतर शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे हसत खेळत घराकडे दुचाकी वरून येताना आपल्या भावाचा असा करून झालेल्या अपघातानंतर या बहीणीचा आक्रोश जमावातील लोकांना मनाला वेदना देणारा होता काहीवेळ या बहीणीला काय करावे हे समजत नव्हते मात्र पोलिस गणेश सोनवणे यांनी मोठा आधार दिला घरातील तरुण मुलांच्या मृत्यू मुळे एक कुटुंब उघड्यावर पडले आहे या घटनेनंतर पोलिसांनी देखील मोठी हळहळ व्यक्त केली आहे
चौकट
अरे माझ्या भावाला उचला बहीणीचा आक्रोश.
बहीणीच्या डोळ्यासमोर भावाचा कंटेनर खाली सापडल्या नंतर भावाचा जीव वाचला पाहिजे यासाठी होणारा आक्रोश अपघाताची भिषणता किती मनाला वेदना देणारी होती हेच या घटनेनंतर पुढे आले आहे.
0 Comments