आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

प्रा. साहेबराव दवंगे यांचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कारने सन्मान.

    प्रा.  साहेबराव दवंगे यांचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय  पुरस्कारने सन्मान.कोपरगाव प्रतिनिधी:------- संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे यांना वैजापुर येथिल जिजाऊ बहुउध्देशिय  सेवाभावी संस्थेने त्यांच्या विविध क्षेत्रातील प्रदिर्घ सेवेची दखल घेवुन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय  पुरस्कारने सन्मानीत केले. सदरचा पुरस्कार वैजापुरचे आमदार श्री रमेश  बोरणारे, सारा फाऊंडेशन, ठाणेच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रविण महाजन व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सम्राटसिंह राजपुत यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. 
पुरस्कार वितरण सोहळा नुकताच वैजापुर येथिल पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर वरील मामान्यवरांसह उपजिल्हाधिकारी श्री माणिक आहेर, माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद , औरंगाबादचे अॅड. प्रमोद जगताप, माजी सभापती, पंचायत समिती, वैजापुरचे बाबासाहेब जगताप, माजी नगराध्यक्ष, वैजापुरचे साबेरखान, पुरस्कारचे आयोजक, पोलीस पाटील श्री. सुर्यकांत मोटे, जिजाऊ बहुउध्देशिय  सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अॅड. धनराज अंभोरे, सचिव श्री संतोश दोंडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
जिजाऊ बहुउध्देशिय  सेवाभावी संस्थेने राज्यातील शिक्षण , साहित्य, सामाजीक, कला, वैद्यकिय, अशा  विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना हेरून त्यांचा यथोचित सत्कार करून छत्रपती शिवाजी  महाराज राष्ट्रीय  पुरस्कारने गौरविले. यात संजीवनी पाॅलीटेक्निकचे प्रा. साहेबराव दवंगे यांचाही समावेश  होता. संजीवनी मधिल प्रा. दवंगे यांची ३७ वर्षे  एक उत्कृष्ट शिक्षक , इंग्रजी दैनिकाचे पत्रकार, संमोहन तज्ञ म्हणुन राज्यात अनेक मनोरंजनाचे व खास करून विध्यार्थ्यांच्या  गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयोग, राज्यात व गुजरात मध्येही करीअर गाईडन्स वर उत्कृष्ट मार्गदर्शन  करणारा वक्ता, कोणत्याही कार्यक्रमाचे मराठी, हिंदी व इंग्रजी  भाषेतून उत्कृष्ट  सुत्रसंचलन, संजीवनी मध्ये २२ वर्षे  रेक्टर पदाचा अतिरीक्त कार्यभार, १५ वर्षे  मेंटेनन्स इंजिनिअरचा अतिरीक्त कार्यभार, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  प्रसिध्दी माध्यम प्रमुख, कोपरगांव तालुक्यातील सर्व पत्रकारांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे व याचबरोबर एक प्रगतशील शेतकरी ,  अशा विविध पैलुंची दखल घेवुन जिजाऊ बहुउध्देशिय  सेवाभावी संस्थेने त्यांचा सन्मान केला. 
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे, माजी आमदार व बीजेपी सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी प्रा. दवंगे यांचे पुरस्कार प्राप्तीबध्दल अभिनंदन केले. 

Post a Comment

0 Comments