आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

गोकुळनगरी पुलालगतच्या रस्त्याचे वाजले तीन तेरा. खडडे झाले मस्त... मरण झालं स्वस्त.

 गोकुळनगरी पुलालगतच्या रस्त्याचे वाजले तीन तेरा. 

खडडे झाले मस्त... मरण झालं स्वस्त.

तातडीने दुरुस्ती करा अन्यथा तिव्र अंदोलन करु


कोपरगांव प्रतिनिधी:----- गोकुळनगरी पुल हा शहरातील मुख्य रस्ता म्हणुन ओळखला जातो या पुलालगत असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या तीन तेरा वाजलेल्या  रस्त्यामुळे मोठया प्रमाणात खडडयांचे व धुळीचे साम्राज्य पसरले असुन तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा तीव्र अंदोलन करु असा इशारा सामाजीक कार्यकर्ते नीसार शेख यांच्यासह परिसरातील नागरिकांनी व शहरातील नागरिकांनी दिला आहे.

 
शहरात पुरपरिस्थिती दरम्यान महत्वाचा ठरणारा गोकुळनगरी पुल कमी उंची असल्यामुळे पाण्याखाली गेल्यावर शहराशी नागरीकांचा संपर्क तुटत असल्यामुळे नागरिकांची फारमोठी गैरसौय होत असल्याने या परिसरातील नागरिकांनी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केल्यानंतर सदर मागणीची दखल घेवुन माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शासनदरबारी पाठपुरावा करुन 37 लाख रुपये मंजुर करुन सदर पुलाची उंची वाढविल्यामुळे शहरासह, ग्रामणीभागतील नागरिकांना या पुलावरुन जाणे येण्यासाठी सोयीचे झाले, कामाचा दर्जा व गुणवत्ता राखून गोकुळनगरी पुलाचे काम तातडीने पुर्ण करावे असे सुचना देखील माजी आमदार सौ स्नेहलता  कोल्हे यांनी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना दिलेल्या असतांना देखील यांनी पुला लगत असलेल्या रस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता खराब झाल आहे. अद्यापही हा रस्ता दुरुस्ती केलेला नाही, खडडे झाले मस्त... मरण झालं स्वस्त अशी म्हण आता म्हणयाची वेळ आता शहरातील नागरिकांवर आली आहे. दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणा-या वाहनचालक व नागरिकांना शारीरिक व्याधींचा त्रास वाढला. अनेकांमध्ये पाठीचे व मानेचे दुखणे बळावले आहे. ब-याचदा गरोदर भगिनी व वृध्दांसाठी हा रस्ता आता घातक ठरतत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरुन चालणे देखील कठीण झाले आहे. छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहे. हा रस्ता बनविण्यासाठी चांगले साहित्य वापरुन उत्तम दर्जाचे रस्ता बनवुन शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा लवकरात लवकर सुरु नाही केले तर तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील सामाजीक कार्यकर्ते नीसार शेख यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.  

Post a Comment

0 Comments