आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शिवजयंतीनिमित्त औषध फवारणी मशीनचे काका कोयटे यांच्या हस्ते लोकार्पण

 शिवजयंतीनिमित्त औषध फवारणी मशीनचे काका कोयटे यांच्या हस्ते लोकार्पण.





कोपरगाव प्रतिनिधी :-----
साई  निवारा मित्र मंडळ, निवारा यांचे वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने

निवारा, सुभद्रानगर, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी नगर, येवला रोड, आढाव वस्ती, साई-सिटी, सह्याद्री कॉलनी, द्वारका-नगरी, शंकरनगर, ओमनगर आदि परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षेसाठी प्रभाग क्र २ मध्ये रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी मशीन लोकार्पण श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे 

(अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन,संस्थापक, निवारा हौसिंग सोसायटी) यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,निवारा परिसरात नगरसेवक श्री.जनार्दन कदम आणि सौ. दीपा गिरमे यांच्या नेतृत्वाखाली मोठया प्रमाणात सामाजिक कामे झाली असून काही कामे लोक वर्गणीतूनही केली जात आहे.रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी मशीनचे लोकार्पण करून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने  उत्तम काम केले आहे.या औषध फवारणी मशिन चा फक्त प्रभाग क्रमांक २ साठीच उपयोग न करता सर्व कोपरगाव शहरात या मशिन चा उपयोग होऊ शकतो. अशीच कामे सदैव करावीत.परिसरातील नागरिकांचे नेहमीच सहकार्य असेल.असेही काका कोयटे शेवटी म्हणाले.

 तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष श्री.स्वप्निल निखाडे म्हणाले की,महाराष्ट्र शासनाने सर्व  नगरपालिकांमधून सर्वोत्कृष्ट नगरसेवक म्हणून पुरस्कार देण्याची घोषणा अंमलात आणली तर कदम करत असलेल्या अनेक सामाजिक उपक्रम,कामांमुळे नक्कीच त्यांना मिळाला असता.त्यांनी अशीच कामे सतत करत राहावी. याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ सुहासिनीताई कोयटे,श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार,  अमृत संजीवनी चेअरमन श्री पराग संधान, शिवसेना गटनेते श्री योगेश बागुल, माजी नगरसेवक श्री बबलू वाणी,श्री विनोद राक्षे, नगरसेवक श्री संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री अकबर भाई शेख, निसार भाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. तर परिसरातील श्री लक्ष्मीनारायण भट्टड, निवारा सोसायटीचे माजी चेअरमन श्री सुरेंद्र व्यास, श्री अमोलशेठ महापुरे, श्री प्रमोद नरोडे, श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळ कार्याध्यक्ष श्री विष्णुपंत गायकवाड, श्री तुषार आहेर, श्री अमोल राजूरकर, श्री प्रताप जोशी, श्री गौरव अग्रवाल, श्री संजय पोटे, श्री राजेंद्र पाटणकर, श्री ज्ञानदेव ससाने, श्री पोपट वीर, श्री विजय बोथरा, श्री जगन्नाथ बैरागी व सौ नंदिनी कदम, सौ विमलताई कर्डक आदींसह सर्व स्थानिक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नगरसेवक श्री जनार्दन कदम केले तर उपस्थितांचे आभार वैभव गिरमे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments