आमचा फक्त भ्रष्टाचाराला विरोध आहे शहर विकासाला नाही - स्वप्नील निखाडे.
दोन महिन्यांनी नगराध्यक्ष ज्या इमारतीती बसणार आहे तो निधी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आणलेला आहे.----पराग संधान.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:------ नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नगरसेवक असे दाखवतात की आम्हाला शहराचा खूप कळवळा आहे मात्र आम्हीही नगरसेवक आहोत आम्हालाही शहराची काळजी आहे.आमचा शहर विकासाला कोणताही विरोध नसून विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे म्हणून सर्वसाधारण सभेत विषय नामंजूर केले असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नावाने खडे फोडनाऱ्यांनी निधी वापरून एकही फलकावर कोल्हे यांचे नाव लावले नाही.आम्हाला राजकारण करायचे नाही गुलाब फुले वाटून नौटँकी कारायचे कामे सुरू असून सोलर पॅनल वर लाईट लावण्यापेक्षा विकासाचे दिवे लावा अशी टीका उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादी कॉग्रेस च्या नगरसेवकांवर केली आहे.
यावेळी भाजपा नेते पराग संधान,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,नगरसेवक शिवाजी खांडेकर,बबलू वाणी,नगरसेविका दीपा वैभव गिरमे,बाळासाहेब आढाव आदी उपस्थित होते.
यावेळी अधिक बोलतांना निखाडे म्हणाले की, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा व शिवसेना नगरसेवक यांना काळ्या फिती लावून निषेध करत उपस्थिती लावली होती.साडे चार वर्ष ज्या नगराध्यक्ष यांनी स्वतः नियम न पाळत अनेकांची अपमान केले असून ते आम्हाला आमचे अधिकार शिकवत आहे. साडे चार वर्षे आम्हाला पत्रक व माहिती दिली जात नाही नगराध्यक्ष वहाडणे यांचा संपूर्ण कार्यकाळ व ते स्वतः निष्क्रिय असून
कोपरगाव शहराला दोन रोटेशन पुरेल इतकेच पाणी तळ्यात शिल्लक आहे.तर पालिकेतील सभेत जे विषय नामंजूर केला आहे.त्याची पत्रके वाटून देखील निषेध केला आहे.आमचा शहरातील रस्त्याला विरोध नाही मात्र त्याचे अंदाजपत्रक जास्तीचे आहे ,जे रस्ते कामाचे नाही ते घेतले आहे.ह्यात होणारा भ्रष्टाचार हा रोखण्यासाठी ते नामंजूर केले असल्याचे निखाडे यावेळी म्हणाले.
पराग संधान म्हणाले की,15 सप्टेंबर रोजी झालेल्या मिटिंगचे पाच महिन्यात कच्चे प्रोसेडींग दिले गेले नाही.दोन महिन्यांनी नगराध्यक्ष ज्या इमारतीती बसणार आहे तो निधी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आणलेला आहे.
नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना ज्यांनी निधी आणला त्यांना श्रेय द्यायला आवडत नाही. शहरातील विकासात भर घालण्यासाठी शहरातील बाजार ओटे, पालिकेची सार्वजनिक ग्रंथालय,कोपरगाव पोलिस ठाणे,पालिका इमारत,गोकुळ नगरी पूल अशे एक ना अनेक कामे माजी आमदार यांनी केले असून पालकमंत्री यांच्या एका मिटिंग मध्ये यांना लगेच निधी मिळाला का ? असा सवाल देखील विचारला आहे.
चौकट- ज्यांनी निवडणूक झाल्यानंतर आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याकडून पैसे घेऊन महिनाभर संपूर्ण देवयात्रा केली त्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे .जे दुसऱ्याच्या दुकानात कामाला होते त्यांचेच दुकान बळकावून स्वतः मालक झालेल्यांनी आम्हाला विकासाच्या गोष्टी करून शिवसेनेबद्दल काहीही शिकवू नये.बोलायला लागलो तर तुमचे सर्व जुने उद्योग बाहेर काढील.
- कैलास जाधव उपजिल्हाप्रमुख
0 Comments