आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

खराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.

 खराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.

नगर-मनमाड महामार्गावरील घटना.
शिर्डी प्रतिनिधी ------ खराब झालेला नगर मनमाड रस्ता शासनाला नसलेले गांभीर्य नगर मनमाड रोडला वाढत असलेले अतिक्रमणे शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष मुळे याची किंमत देवळाली प्रवरा येथील दुचाकी वरून कोपरगाव कडे जाणाऱ्या ऋषिकेश विजय भागवत वय ३०  या कोपरगाव येथील संजीवनी टेक्निकल कॉलेज च्या तरुण  शिक्षकाचा  मंगळवार दिनांक १६फेब्रूवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सावळी विहीर येथे  दुचाकी स्लीप झाल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहन  अंगावरून गेल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याचे दुर्देवी घटना घडल्याने एक कुटुंब  उघड्यावर आले आहे

.मयत  शिक्षक विजय भागवत हे दुचाकी नंबर up 14 cz 1891 वरून शिर्डी मार्गे कोपरगाव कडे जात असताना सावळी विहीर फाट्या जवळ दुचाकी स्लीप झाली त्यावेळी भागवत यांनी हेल्मेट ही घातले होते अपघात होताच वाहनाच्या मागील चाकात अडकल्याने शरीर चिन्हविचींन्ह झाले होते तर रस्त्यावर रक्ताचे मोठे थारोळे  साचले होते तर मेंदूचा काही भाग चक्क हेल्मेट मध्ये अडकून पडलेला होता तर रोडवर मास विखुरलेले होते  शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृत्देहाचा भाग गोळा करत पुढील कारवाई साठी दवाखान्यात पाठवुन  दिला ह्या अपघातास  कारणीभूत  ठरलेले वाहन भरधाव  वेगाने निघून गेले त्याचा शोध लागलेला नव्हता   घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे या दृदैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.Post a Comment

0 Comments