Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

वृद्धाश्रमाला मिष्टान्न भोजन देत सेवा प्रतिष्ठान ने केली आगळीवेगळी शिवजयंती साजरी.

 वृद्धाश्रमाला मिष्टान्न भोजन देत सेवा प्रतिष्ठान ने केली आगळीवेगळी शिवजयंती साजरी.


कोपरगाव प्रतिनिधी:--कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यत अग्रेसर असणाऱ्या सेवा प्रतिष्ठान च्या वतीने आज अखंड हिंदुस्थानचे चिरंतन स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमाला मिष्ठान्न भोजन दिले असल्याची माहिती माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी दिली. ते म्हणाले की, ज्या वयोवृद्ध लोकांना त्यांच्या घरच्यांनी व समाजातील काही लोकांनी नाकारले अशा लोकांसोबत शिवजयंती उत्सव साजरी करण्याचा आनंद वेगळा आहे.या अगोदरही सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक सामाजिक दुर्बल घटकांसाठी व नुकत्याच कोरोनाच्या  काळामध्ये देखील अनेक उपक्रम राबवले आहे. समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करताना मनस्वी आनंद होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले . या उपक्रमामध्ये सेवा प्रतिष्ठानचे विशाल निकम, प्रशांत वाबळे, बापू वडणे, शुभम रोमारे ,सोमनाथ आढाव, दिनेश गाडेकर, संकेत पारखे, अजिंक्य कदम, अभिषेक सपकाळ ,ऋषिकेश खिलारी, संदीप गोंदकर, गणेश आढाव, हर्षल संजय वाणी, निखिल कराचीवाला, पिनू सावरकर, आदी सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments