मंत्री झालात म्हणून तुम्हाला साधूंना अपशब्द वापरण्याचा परवाना मिळालेला नाही:--माजी आ.स्नेहलता कोल्हे.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी ---- महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. साधू आणि संत यांच्यातील फरक सांगताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली हा भारतीय संस्कृतीला आणि आध्यात्मिक क्षेत्राला असे अपमानास्पद वक्तव्य करून एका मंत्र्याने नितीमुल्य पायदळी तुडवणे हे निंदनीय आहे. साधू आणि संत वेगळे असतात साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात असं वादग्रस्त वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं हा केवळ साधूंचाच नाही तर हा धार्मिक अस्मिता जपणाऱ्या सर्वांचाच अपमान त्यांनी केला आहे. एका मंत्र्याला असे विधान करणे हे शोभत नाही त्यांनी तात्काळ सर्व साधूंची माफी मागावी अन्यथा सरकारने अशा बेजबाबदार विधान केल्या बद्दल मंत्र्यावर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी करुन ते पुढे म्हणाले की, संत समाजासाठी समर्पित होऊन काम करतात त्यांचा असा अनादर होणे म्हणजे आपण कोणत्या राजवटीत राहतो आहोत असा प्रश्न सामान्य जनतेला पडावा अशी बेताल विधाने मंत्री महोदय करत असतील तर ही गंभीर बाब आहे. तुम्ही मंत्री झालात म्हणून तुम्हाला साधूंना अपशब्द वापरण्याचा परवाना मिळालेला नाही हे विसरू नका. मंत्रीच जर साधू-संताना शिव्या घालणार असतील तर का साधूंच्या हत्या होणार नाहीत..? असा परखड सवाल देखील सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनाला केला आहे. अध्यात्माच्या माध्यमातून समाज जागृती व समाज जडणघडणीचे काम साधू आजीवन करत असतात.साधू हे आपल्या राष्ट्राची अविनाशी संपत्ती आहेत त्यांचे विचार त्याग हा धार्मिक आणि आध्यात्मिक अस्मिता जोपासण्यासाठी मोलाचा असतो त्यामुळे प्रत्येकानेच साधू संत यांचा आदर केला पाहिजे असे मत स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केले.
0 Comments