आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष छोटुभाई जोबनपुत्रा यांचे निधन.

 ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष छोटुभाई जोबनपुत्रा यांचे निधन.




कोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव शहरातील सामाजिक व शैक्षणिक कार्यात जीवनभर मोलाचे योगदान देणारे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून समाजातील अनेक ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक सुविधांचा लाभ देणारे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कै.व मयुरइलेक्ट्रिकल्स चे मालक योगेश जोबनपुत्रा व निलेश जोबनपुत्रा यांचे वडिल  छोटुभाई जोबनपुत्रा यांचे आज पहाटे 6-30वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ नागरिक संघाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची अंतयात्रा दुपारी ४-00 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.

छोटूभाई यांनी १९९५ साली  नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कामासाठी ज्येष्ठ नागरिक संघात ते सामील झाले. स्व. भागचंद ठोळे, स्व.अॅड.पी.डी.गुजराथी, स्व.स.द.भोसले, स्व.भायभंग, जेष्ठ पत्रकार सी.बी.गंगवाल यांच्यासमवेत सन.२०००हजार पासून ते आजपर्यंत जेष्ठ नागरिक मंच च्या माध्यमातून त्यांचे समाजसेवेचे त्यांचे काम अखंडपणे चालू होते. ज्येष्ठ नागरिक सेवा मंच द्वारे शालेय मुलांना पुस्तके व गणवेश वाटप तसेच आरोग्य शिबिरे सर्वरोग निदान शिबिर डोळ्यांचे शिबिरे रक्तदान शिबिर व वैचारिक परिसंवाद द्वारे छोटू भाई चे सामाजिक काम सुरू होते. या कामात त्यांना कैलास शेठ डोळे, चंद्रकांत डोळे, प्रभाकर बोरावके, विजय बंब हे सहकार्य करत होते.या कामात कै.छोटूभाई यांची आई.स्व.झमकुबेन व धर्मपत्नी स्व. पद्मावती बेन यांच्यामुळेच सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.

Post a Comment

0 Comments