अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदी कोपरगाव औदयागिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोपरगाव सेवा सोसायटी मतदार संघातून विवेक कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याच मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सौ अलकादेवी राजेंद्र जाधव यांनी यापुर्वी आपला अर्ज माघारी घेतला असून आज किसनराव चंद्रभान पाडेकर आणि देवेंद्र गोरख रोहमारे यांनी आज
आपल्या उमेदवारी अर्जाची माघार घेतल्याने श्री कोल्हे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 11 फेब्रुवारी पर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे.
कोपरगाव सेवा सोसायटी मतदार संघातून संचालक पदासाठी अर्ज दाखल केलेले विवेक कोल्हे हे कोपरगाव सहकारी औदयोगिक वसाहतीचे चेअरमन असून इंडियन फारमर्स फर्टिलायझर कोआॅपरेटिव्ह लिमिटेड, नवी दिल्ली या संस्थेवर जनरल बाॅडी सदस्य म्हणून ते कार्यरत आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना,शेतकरी सहकारी संघ लि., संजीवनी सहकारी पतसंस्था लि.आदि संस्थाचे संचालक म्हणून ते कार्यरत आहे. कोल्हे यांचे शिक्षण बी.ई.सिव्हील पर्यंत झालेले आहे. कोल्हे घराण्यातील तिसरी पिढी विवेक कोल्हे यांच्या रूपाने जिल्हा बॅंकेत पदार्पण करीत असून यापुर्वी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब हे देखील संचालक पदी राहिलेले आहे. तसेच संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष श्री बिपीन कोल्हे यांनी मागील वीस वर्षे जिल्हा बॅंकेवर प्रतिनिधीत्व केले असून बॅंकेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांचे ते चिरंजीव आहे.
विवेक कोल्हे यांच्या रूपाने एक तरूण नेतृत्व जिल्हा बॅंकेवर जात असल्याने तालुकाभर युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे विवेक कोल्हे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
0 Comments