Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी२लाख६३हजार रुपयांचा मुद्देमाल नेला चोरुन शहरातील रिध्धी-सिध्ध नगर येथील घटना.

घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी२लाख६३हजार रुपयांचा मुद्देमाल नेला चोरुन

शहरातील रिध्धी-सिध्ध नगर येथील घटना.

 चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान.

कोपरगाव प्रतिनिधी.---- 
शहरातील रिध्धी-सिध्धी नगर येथे शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी. घराचे कुलूप तोडून २लाख६३हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की कोपरगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या रिद्धी सिद्धी नगर येथे राहत असलेले मधुकर चंद्रभान काळे यांच्या घराचे  शुक्रवार रात्री कुलूप तोडून सुमारे २लाख ६३हजार५००रुपयांचा ऐवज चोरून नेला यामध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल व तीन घड्याळे असा एकूण दोन लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत मधुकर चंद्रभान काळे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर७०/२०२१ भा.द.वि. कलम.४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास स.पो.नी.दिपक बोरसे हे करत आहे. 


कोपरगाव शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून शहरात वाढलेल्या भुरट्या चोऱ्या मटका जुगार अवैध व्यवसाय यामुळे पोलिसांचा वचक नसल्याचे चित्र दिसत आहे या अगोदरही शहरातील श्रद्धा नगरी येथे भर दिवसा अक्षय लोहाडे यांच्या घराचे कुलूप तोडून तीन लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती या तपासाचे काय झाले? असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहे. शहर पोलीस स्टेशनला नव्याने नेमणूक झालेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पुढे आता शहरातील अवैध धंद्यांना सह घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हानच उभे आहे.

Post a Comment

0 Comments