आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

वृंदावन डायग्नोस्टीक व डाॅ. वाघडकर हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

 वृंदावन डायग्नोस्टीक व डाॅ. वाघडकर हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर.


  कोपरगाव प्रतिनिधी ----- 
शहरातील डॉ वाघडकर जनरल हॉस्पिटल, व  वृंदावन डायग्नोस्टीक सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने  मोफत  आरोग्य  ‍ शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. संदिप मुरुमकर यांनी दिली. मंगळवार
रो सकाळी 10 ते  दुपारी 2वाजेपर्यंत कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन या ठिकाणी होणार आहे. या शिबिराविषयी अधिक माहिती देताना डॉ मुरुमकर म्हणाले की,
आरोग्य धनसंपदा  या उद्देशाने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीराची वैशिष्टे बी एम आय   (Body Mass Index ) रक्त शर्करा प्रमाण तपासणी (Blood Sugar Level),इलेक्ट्रोकार्डीयोग्राम (E.C.G.)फुप्फुसाची कार्यक्षमता तपासणी (Pulmonary Function Test), रक्तदाब तपासणी (Blood Pressure/ B.P.),आहार ‍विषयक मार्गदर्शन निरोगी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन (Healthy & Happy Life-style), शिबीराचा लाभ कोणी घ्यावा मधुमेह (Diabetes) दमा,‍ अतिधुम्रपान विकार (Asthama/ C.O.P.D),ॲलर्जीक खोकला, वारंवार सर्दी ,ॲनिमीया  (Haemoglobin कमतरता ) हृदयरोग, पोटाचे विकार पित्ताचे विकार,थाईरॉईड ,मायग्रेन ,व्हर्टीगो, कोव्हीड-19  होउन गेलेल्या रुग्णांसाठी इतर सर्व आजारांसाठी आहे. तसेच एकतास स्वत:साठी, आरोग्यमय जीवनासाठी ह्या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे यात तज्ञ डॉक्टर श्री राजेंद्र वाघडकर हे मार्गदर्शन करणार  असून आपली दैनंदिन जीवननशैली त्यातुन सतत वाढणारा ताण-तणाव कसा हाताळावा, आपला आहार व विहार याबद्दल शास्त्रोक्त मार्गदर्शन . कोव्हीड-19 संक्रमणाला सामोरे जातांना आपले व आपल्या परीवाराची काळजी कशी घ्यावी.


Prevention  is better than Cure 

आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक योजना करणे कधीही चांगलेच.  येतांना आपले जुने रिपोर्ट व फाईल बरोबर घेउन येणे आवश्यक आहे. वरील शिबीराचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणी क्र.  8686-22-9494/  7423-949494.  शिबीर यशस्वी होण्यासाठी दौलतराव जाधव पोलिस निरीक्षक कोपरगांव ग्रामिण पोलिस स्टेशन, हर्षवर्धन गवळी पोलिस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन यांनी विशेष सहकार्य केले आहे.तरी या शिबिराचा सर्वा़ंनी लाभ घेण्याचे आवाहन  डॉ. मुरुमकर व डॉ. वाघडकर यांनी केले आहे.


Post a Comment

1 Comments