आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहराला 4 कोटी रुपये देण्याचे तत्त्वतःमान्य.---नगराध्यक्ष विजय वहाडणे.

 वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहराला 4 कोटी रुपये देण्याचे तत्त्वतःमान्य.---नगराध्यक्ष विजय वहाडणे.

कोपरगांव प्रतिनिधी- अहमदनगर येथील नियोजन भवनात नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

             यावेळी बोलतांना कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले कि, गेली चार वर्षे जाणीवपूर्वक राजकिय कारणाने कोपरगाव नगरपरिषदेला विकास निधी मिळू दिलेला नाही. निदान यावर्षी तरी कोपरगावसाठी भरीव विकास निधी मिळावा. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मा. श्री.महेश पाठक यांनी नगराध्यक्ष श्री.विजय वहाडणे यांचेशी चर्चा करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 4 कोटी रुपये देण्याचे तत्त्वतः मान्य केले.

          त्याचबरोबर गोदावरी नदी संवर्धन- घाट सुशोभीकरण व शुकलेश्वर-कचेश्वर देवस्थानसाठी तीर्थक्षेत्र पर्यटन इ.साठी विकास निधी मिळावा अशीही आग्रही मागणी केली. यावेळी आमदार आशुतोषजी काळे यांनी 5 नंबर साठवण तलाव व शहरातील रस्त्यांसाठी तसेच शहराच्या वाढीव भागाच्या विकासासाठी निधीची मागणी केली. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. श्री.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील, कोपरगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रशांत सरोदे, महापौर वाकळे व जिल्ह्यातील बहुसंख्य नगराध्यक्ष उपस्थित होते. ना.एकनाथजी शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लागणार असल्याने सर्वांनीच या आढावा बैठकीचे स्वागत केले.       

Post a Comment

0 Comments