आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी एम.बी.ए.च्या ३२ विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या - श्री. अमित कोल्हे.

 संजीवनी  एम.बी.ए.च्या ३२ विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये  नोकऱ्या  - श्री. अमित कोल्हे.

                                         संजीवनी  करीत आहे विध्यार्थी व पालकांची स्वप्नपुर्ती.







कोपरगांव प्रतिनिधी :------ संजीवनी एम.बी.ए. विभागाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने एम.बी.ए.  अंतिम वर्षाच्या ३२ विध्यार्थ्यांचे  विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण
झाले असुन विद्यार्थी व पालकांनी संजीवनीवर टाकलेला विश्वास  संजीवनी एम.बी.ए. ने सार्थ ठरविला आहे व संजीवनी एम.बी.ए. ने सुध्दा विध्यार्थ्यांना  नोकऱ्या  मिळवुन देण्याचे लक्ष पुर्ण करीत आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 
सर्व निवड झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचे  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री. शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितिनराव कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संजीवनी एम.बी.ए. विभागाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने टीसीएस, बर्जर पेंट, इटामॅक्स, ओम लाॅजिस्टिक्स, स्ट्रेट स्ट्रीट एचसीएल,  अॅटोस सिन्टेल, एक्सा बिझिनेस, या कंपन्यामध्ये ३२ विध्यार्थ्यांना  नोकरी मिळवुन देवुन स्वावलंबी बनविले. यातील बहुतांशी  विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असुन यात टीसीएस कंपनीने अनिकेत रावसाहेब आहेर व ऋषिकेश  बाळासाहेब गायकवाड यांनी सुरूवातीस वार्षिक  पॅकेज रू ५. ७९ लाख इतके पॅकेज देवु केले आहे. तर बर्जर कंपनीने शुभम विश्वनाथ  बोरखडे यास वार्षिक  पॅकेज रू ५ . ७५ लाख दिले आहे. इतरही सर्व  विध्यार्थ्यांना  चांगले पॅकेज मिळाले आहे. यामुळे त्यांच्या कुटूबाचा आर्थिक कणा मजबुत होण्यास मदत होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी  आपला पारंपारीक व्यवसाय सांभाळत उद्योजक हेाणे पसंद केले.
श्री. कोल्हे पुढे म्हणाले की राज्यातील बहुतांशी  व्यवस्थापन महाविद्यालयांचे व्यवस्थापन शास्त्र  कोलमडले असताना संजीवनी एम.बी.ए. विभागाने उद्योग जगताला कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ लागते हे हेरले आणि केवळ पुस्तकी शिक्षण  दिल्याने उद्योग जगताच्या अपेक्षा पुर्ण होवु शकत नाही हे जाणले. आणि तशा पध्दतीने शिक्षण  व प्रशिक्षण पध्दती राबविली. एवढ्या मोठ्या  संख्येने विध्यार्थ्यांना  नोकरी मिळण्यासाठी एम.बी.ए. विभागा अंतर्गत प्राचार्य, एम.बी.ए. विभाग प्रमुख, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफिसर  यांनी विशेष  परीश्रम घेतले आणि विद्यार्थी व पालकांनी टाकलेला विश्वास  सार्थ ठरविला, असे श्री. कोल्हे शेवटी म्हणाले.

Post a Comment

0 Comments