आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सुशीलाबाई उर्फ माई यांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा आयोजित होणे हे द्रष्टेपणाचे लक्षण - डॉ. प्रभाकर देसाई

 सुशीलाबाई उर्फ  माई यांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा आयोजित होणे  हे द्रष्टेपणाचे  लक्षण - डॉ. प्रभाकर देसाई                                                                                         





कोपरगाव प्रतिनिधी :------- आपुलकीची उब मिळाली की, प्रेमाचा पाझर फुटतो व व्यक्तिमत्व खुलते त्यासाठी आई कळावी लागते. आईच्या कर्तृत्वाची आठवण सतत येणे हे संस्कृतीचे लक्षण असताना महाविद्यालयात सुशीलाबाई उर्फ  माई यांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा आयोजित होणे  हे द्रष्टेपणाचे  लक्षण असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला विभागाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले. ते कोपरगाव येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात आयोजित  अंतर  महाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे येथील प्रसिद्ध उधोगपती सुनीलराव जगताप हे होते. सदर कार्यक्रमास कोपरगाव विधानसभा आमदार आशुतोषजी काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.    डॉ. देसाई यांनी पुढे सांगितले की, शिक्षण महर्षी शंकररावजी काळे व  शंकररावजी कोल्हे यांच्या महान व्यक्तीमत्वातून ज्ञान मंदिर साकारले यामध्ये सुशीलाबाई नावाच्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाने शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक, व्यावसायिक व पारिवारिक आपुलकीचा ठसा उमटविला ही एक उल्लेखनीय बाब असल्याने महाविद्यालय त्यांच्या नावाने एक चांगली परंपरा कोरोनाच्या काळाचे भान ठेऊन वक्तृत्व स्पर्धेचा नावलौकिक जोपासत आहे.  

  आमदार आशुतोषजी काळे यांनी स्पर्धेचा उद्देश सांगत असताना माईच्या आठवणीतून नेहमीच बालपण जागे होते, माईचे व्यक्तिमत्व तरुणांना आपल्या आईचे दर्शन घडविते व नेहमी सकारात्मक उर्जा देते. स्पर्धेतील इतर विषयांच्या चिंतनातून नेहमीच वैचारिक शक्ती वाढविण्यास बळ मिळते असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय विचार व्यक्त करताना उद्योगपती सुनीलराव जगताप यांनी चांगल्या वक्तृत्वाची सोदाहरण ओळख करून दिली.  सदर कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संदीप वर्पे, सुनील गंगुले परीक्षक डॉ. प्रकाश शेवाळे, डॉ. चंद्रकांत रुद्राक्षे, डॉ. निर्मला कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. आर. थोपटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्पर्धा संयोजक डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. या स्पर्धा यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा. रमेश झरेकर, डॉ. विजय निकम, प्रा. ए. के. देशमुख, प्रा.डी. डी. सोनवणे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. छाया शिंदे यांनी केले व आभार डॉ. सुरेश काळे यांनी मानले.


प्रति, 

Post a Comment

0 Comments