Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे सह्याद्री कॉलनीतील नागरिकांचे हाल

 रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे सह्याद्री कॉलनीतील नागरिकांचे हाल


कोपरगाव प्रतिनिधी :------ शहर हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने  कोपरगाव नगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सह्याद्री कॉलनीतील रस्ता बनवण्याचे काम अंदाजे दोन महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले होते. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर परिसरात रस्ता होणार या भावनेने परिसरातील नागरिक काही काळ खुष झाले. मात्र गेल्या दोन महिन्यापासून रस्तावर फक्त खडी पसरवली आहे.  रस्त्यावर खडी पसरवल्या नंतर अचानक काम बंद करण्यात आले. दोन महिन्यांपासून टाकून ठेवलेल्या खडीमुळे रस्त्यावर पायी चालणे तसेच दुचाकी चालवणे अवघड झाले असून नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. या संदर्भात नगरपालिकेच्या संबंधित बांधकाम अभियंता दिगंबर वाघ  यांच्या कडे चौकशी केली असता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काही बंगल्याचे कंपाऊंड रस्त्यावर आल्याने व याबाबत काही नागरिकांनी आधी अतिक्रमणे काढून मगच रस्ता बनवण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. तसेच आपण यासंदर्भात अतिक्रमण धारकांना नोटीस काढणार असल्याचे सांगितले. मात्र त्यालाही बराच अवधी झाला आहे . ठराविक लोकांच्या अतिक्रमणाचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे . तरी  नगरपालिकेने  लवकरात लवकर अतिक्रमण काढून रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी  परिसरातील  नागरिकांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments