माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते डॉ. गोंधळी यांचा सन्मान.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :---- भारतीय वैद्यकीय संघटना (IMA),शाखा कोपरगावच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द डॉ.महेंद्रजी गोंधळी यांची निवड करण्यात आली आहे. डाँ.महेंद्र गोंधळी हे गेल्या अनेक वर्षीपासून कोपरगाव , लोणी ,आदी ठिकाणी रुग्ण सेवा करत आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान कोपरगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील यांनी सन्मान करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कोपरगाव औद्योगिक वसाहतचे संचालक डॉ.चंद्रशेखरजी आव्हाड, डॉ. मेघाताई गोंधळी,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, छायाचित्रकार श्री.हेमचंद्रजी भवर आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना काळात ही डॉक्टर यांनी पेशंट ला सेवा देण्याचे काम आहोरात्र केले आहे.आय.एम.ए.अध्यक्ष डॉ. महेंद्रजी गोंधळी यांनी संघटनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवून वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय व्यक्त केला...
0 Comments