कर्णबधीर रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मशीन वाटप शिबीराचे आयोजन.-- सी.ई.ओ. कांन्हूराज बगाटे.
![]() |
![]() |
सद्यःस्थितीत महागाई व माहीती अभावी ग्रामीण भागातील अनेक रुग्ण आधुनिक हिअरींग एड मशीन घेण्यापासुन वंचित राहतात. अशा रुग्णांना लाभ होण्यासाठी न्यु साऊंड हिअरींग एड प्रा.लि., दिल्ली यांच्या सहकार्यातून श्री साईनाथ रुग्णालयात “कर्णबधीर रुग्णांची मोफत कानाची तपासणी (ऑडीओमेट्री) करुन आवश्यक त्या कर्णबधीर रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मशीन वाटप” शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जवळपास ५०० गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंञ वाटप करण्याचा सदर कंपनीचा मानस आहे. या शिबीरात श्री साईनाथ रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागातील वैद्यकिय अधिकारी डॉ.शोभना कोल्हे, डॉ.अमोल जोशी, डॉ.योगेश गेठे व डॉ.शिरीष शेळके हे सहभागी होणार असल्याचे संस्थान प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे.
तरी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी श्री साईनाथ रुग्णालयाच्या स्वागत कक्ष विभाग (०२४२३) २५८५५५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन सदर शिबीराचा मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कान्हूराज बगाटे यांनी केले.
0 Comments