राम मंदिर निर्माण कार्यात जनतेने सढळ हाताने दान द्यावे.:----- खा सदाशिव लोखंडे.
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी:----- आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मदिरासाठी शिर्डी शहरात निधी संकलन अभियानाचा शुभारंभ खा सदाशिव लोखंडे शिवसेनेचे राहता तालुक्यातील अध्यक्ष संजय शिंदे शिवसेनेचे नेते कमलाकर कोते जेष्ठ कार्यकर्ते एकनाथ गोदकर श्री साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतिश गंगवाल सामाजिक कार्यकर्ते पोपटराव शिंदे संचिन कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यावेळी बोलताना अयोध्या येथील नियोजित उभारण्यात येत असलेल्या राममंदिर करीता मोठ्या प्रमाणावर लोकांनी देणगी देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन खा सदाशिव लोखंडे यांनी केले
खा लोखंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की अयोध्या येथे राम मंदिर निर्माण होण्यासाठी शेकडो वर्षांपासून अनेकांनी आपले बलिदान दिले असून त्या ज्ञात अज्ञात कारसेवकाच्या बलिदानानतर न्यायालयाच्या निकालानंतर मंदिर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू झाले आहे ४९२ वर्षांपासून यासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष झालेला आहे त्यात अनेकांनी प्राणाचे बलिदान दिले आहे अयोध्या येथे उभारण्यात येणारे हे मंदिर हे देशातील जनतेसाठी मोठी गौरवशाली आनंदाची बाब ठरत आहे मानसाने. मानसाशी कसे वागावे याची शिकवण देणारे प्रेरणास्थान ठरणार आहे जात पात धर्म भेद विसरून रामभक्त दारात जाऊन निधी संकलन करण्यासाठी दारात जाणार आहे अशावेळी लोकांनी मंदिर निर्माण साठी सढळ हाताने मदत करावी असे सांगितले.
0 Comments