दोन हजारांची लाच घेताना शिर्डी पोलीस स्टेशन चे कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
शिर्डी शहरात मोठी खळबळ.
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी -------- दहा दिवसांपूर्वी शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये फलक लावण्यात आला होता कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली तर थेट वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी संपर्क साधावा अशा स्वरूपाचा फलक लावण्यात आला असताना शिर्डी पोलिस स्टेशनचे दोन कर्मचारी सोमवार दिनांक २५ जानेवारी रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने शिर्डी सह शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे
अधिक माहिती अशी की शिर्डी पोलीस स्टेशन मधील कर्मचारी बाळासाहेब यशवंत सातपुते वय ३८ राहणार शिर्डी नोकरी शिर्डी पोलीस स्टेशन व प्रसाद पांडुरंग साळवे वय ४९यांनी १७ जानेवारी ते २५ जानेवारी या काळात शिर्डी शहरात असलेल्या हॉटेल वर कारवाई करू नये यासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती तक्रारदार वय ३१ याची लाच देण्याची मानसिकता नसल्याने थेट नाशिक लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता त्याआधारे लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक उज्वल कुमार पाटील पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाने थेट शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये सापळा लावला होता या सापळ्यात पंचा समक्ष बाळासाहेब यशवंत सातपुते हा दोन हजार रुपयाची लाच घेताना पकडण्यात आले त्याचा सहकारी प्रसाद पांडुरंग साळवे याच्या सांगण्यावरून ही लाच घेत असल्याचे दिसून आल्याने या दोघांच्याही विरोधात लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परीक्षेच्या पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे पोलीस उपाधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा लावण्यात आला होता या कारवाईत लाचलुचपत विभागाचे कर्मचारी मोरे गोसावी माळी बाविस्कर यांनी भाग घेतला लगतच्या पंधरा महिन्याच्या काळात शिर्डी पोलीस स्टेशनचे जवळपास सात कर्मचारी लाच लुचपत विभागाने जेरबंद केले असताना पैशाचा मोह सुटलेले दोन पोलीस कर्मचारी यांनी हॉटेल वर कारवाई न करण्यासाठी मागितलेल्या पाच हजाराच्या लाचे पोटी दोन हजार रुपये थेट पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घेताना पकडल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनच्या परिसरात मोठी शांतता पसरली होती काही दिवसांपूर्वीच शिर्डी पोलिस स्टेशन च्या उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक शिर्डी यांचे मोबाईल नंबर नाव टाकून जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर संपर्क साधावा असा फलक लावला असताना दहा दिवसात दोन कर्मचारी लाचलुचपत विभाग नाशिक यांनी कारवाई करून अटक केल्यामुळे अशा प्रकारचे फलक लावली तरी पोलिस कर्मचाऱ्यांचा पैशाचा मोह सुटत नाही हे जणूकाही अधोरेखित झाले आहे शिर्डी परिसरात गेल्या वर्ष दीड वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणावर अर्थकारण अडचणीत आले आहे अशावेळी कारवाई टाळण्यासाठी अनेकांची लाच देण्याची मानसिकता दिसून येत नाही त्यामुळे जणूकाही नवीन वर्षात पहिल्यांदाच दोन कर्मचारी पकडले गेले आहे अगोदरच जवळपास सात कर्मचारी लाचलुचपत सापळ्यात अडकले असताना या दोन कर्मचाऱ्यांची नवीन वर्षात भरच पडली आहे असे म्हणावे लागेल सरकारी कामासाठी कोणत्याही शासकीय विभागातील कर्मचारी लोकसेवक पैशाच्या मागणीसाठी अडवणूक करत असेल वेठीस धरत असेल तर लोकांनी तक्रारीसाठी पुढे यावे असे आव्हान लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयात जनहितार्थ फलक लावण्यात आले आहे हे फलक जागेवर आहे की नाही याचीदेखील खातरजमा करण्यात येत आहे शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये ज्या ठिकाणी ठाणे अंमलदार बसतात त्या भिंतीवर तक्रारदाराला दिसेल असा फलक काही दिवसापूर्वी लाचलुचपत विभागाने लावला होता मात्र तो बेपत्ता झाल्याने चार दिवसापूर्वीच या विभागाच्या माध्यमातून गोपनीय चौकशी देखील करण्यात आली. होती असे खात्रीलायकरीत्या समजते तो फलक शोधण्यासाठी या विभागाचे कर्मचारी बराच वेळ शोध घेत होते मात्र हा फलक त्यांना मिळून आला नाही मात्र चारच दिवसात लाचलुचपत विभागाच्या नाशिक येथील अधिकाऱ्यांनी कारवाई करून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केल्यामुळे जनहितार्थ फलक जरी कोणी काढला तरी तक्रारीसाठी लोकच पुढे येत असल्याने विभागाचे हे मोठे यश मानावे लागेल वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता व लाचलुचपत विभाग यांचा संवाद वाढत असल्याने व कारवाई होत असल्याचा विश्वास दिसून येत असल्याने आता थेट सर्व सामान्य लोकच लोकसेवकाच्या तक्रारीसाठी पुढे येत असल्याचे दिसून येते त्यामुळे जणू काही पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडत असल्याचे म्हणावे लागेल एकीकडे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाला कोणाची अडवणूक होणार नाही कोणालाही पैशासाठी वेठीस धरले जाणार नाही असा विश्वास दिला असताना हे सापडलेले शिर्डी पोलिस स्टेशनचे दोन कर्मचारी या घटनेतून बरेच काही अधोरेखीत होत आहे शिर्डी पोलीस स्टेशनचे एकाच वेळी दोन कर्मचारी लाचलुचपत खात्याच्या सापडण्याचा हा पहिलाच प्रकार आहे अभ्यास केला तर जवळपास नऊ कर्मचारी शिर्डी पोलीस स्टेशनचे लाचलुचपत च्या जाळ्यात सापडले असल्याचे दिसून येते यामुळे यापुढील काळात तरी हा प्रकार बंद होईल का? लोकांचे आर्थिक शोषण थांबेल का ? कारवाईच्या नावाखाली पैशासाठी अडवणूक बंद होईल का ? हे देखील येणारा काळच ठरवेल असेच म्हणावे लागेल.
0 Comments