गोवंश हत्त्या थांबली नाही तर शहरातील सामाजिक सलोखा बिघडू शकतो ------ विजय वहाडणे.
शहराचे आरोग्य धोक्यात आणू नका
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:------ भरवस्तीत असलेल्या संजयनगर भागातील कसाईखान्यामुळे शहराचे आरोग्य बिघडू नये यासाठी तो शहराच्या बाहेर नेलेला आहे.कोपरगाव नगरपरिषदेने जवळजवळ एक कोटी रुपये खर्च करून मनाई भागात कसाईखाना (स्लॉटर हाऊस) उभारला.अनेक वर्षे बंद असलेले हे स्लॉटर हाउस मी प्रयत्नपूर्वक सुरू करून घेतले.परवानगी आणण्यासाठी स्वतः अधिकारी व कसाई लोकांना घेऊन अहमदनगरला गेलो.अधिकृतपणे व्यवसाय करता यावा,गोवंश हत्या होऊ नये यासाठी हे सर्व केले. कायद्यानुसार फक्त म्हैस वर्गातील प्राणीच कापण्याची परवानगी आहे.पण दुर्दैवाने कोपरगावातील अनेक कसाई कायदे-नियम धाब्यावर बसवून संजयनगर परिसरात सर्रास गोवंश हत्त्या करत आहेत.खरे तर मांस विक्री करण्यासाठी नगरपरिषदेने त्यांना जागाही उपलब्ध करून दिलेली आहे.नगरपरिषदेने सहकार्य करूनही अधिकृत स्लॉटर हाऊसचा वापर होणार नसेल,गोवंश हत्त्या करून जनतेच्या भावना दुखवून मग्रुरी चालूच राहणार असेल,आरोग्य धोक्यात येत असेल तर नगरपरिषदेने दिलेल्या जागा ताब्यात घेण्यात येतील.
असा इशाराही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे तसेच त्यात पुढे म्हटले आहे की , राजकिय नेते गोवंश हत्या होत असूनही,जनतेचे आरोग्य धोक्यात येऊनही बोलणार नाहीत.त्याचे कारणही सर्वांना माहित आहे.नगरपरिषद प्रशासनाला अंधारात ठेवून रात्री अपरात्री होणारी गोवंश हत्त्या थांबली नाही तर शहरातील सामाजिक सलोखा बिघडू शकतो याचे भान सर्वांनीच ठेवण्याची गरज आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी शहराचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना मोजके काहीजण(कसाई) मनमानी करत असतील तर ते सहन केले जाणार नाही. असेही नगराध्यक्ष वहाडणे यांनी पत्रकात शेवटी म्हटलं आहे.
-
0 Comments