साईबाबा संस्थान जाचक नियमाच्या विरोधात शिर्डी कर एकत्र.
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी :---- सार्ईबाबा संस्थांच्या जाचक नियमाच्या विरुद्ध सर्व ग्रामस्थ साईबाबा संस्थांच्या त्रासदायक नियमाच्या विरोधात एकत्र आले असून यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला फटका बसत असल्याचे दिसत असून त्यात सुधारणा होण्याची गरज निर्माण झाली आहे ग्रामस्थांच्या मागणीवर २९जानेवारी पण निर्णय घेतला नाही तर 30 जानेवारी रोजी शिर्डी गाव बंद ठेवून मोर्चा उपोषण याचा अवलंब केला जाईल असा इशारा सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर एकनाथ गोदकर शिवसेनेचे नेते कमलाकर कोते माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके राष्ट्रवादीचे निलेश कोते आदीसह विविध ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थ व पत्रकारांसाठी नियमावली तयार करत असताना ग्रामस्थांच्या हिताच्या संदर्भातील निर्णय होण्याची गरज आहे महाराष्ट्रात कोल्हापूर तुळजापूर पंढरपूर आधीसह विविध मोठमोठी देवस्थाने आहेत त्या ठिकाणी देखील ग्रामस्थांचा अनेक वर्षापासून सन्मान केला जातो तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नियमावली करताना तेथील भौगोलिक परिस्थिती सुद्धा अभ्यास केला पाहिजे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या कार्यपद्धती बद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली व्हीआयपी लोकांना सन्मान देताना स्थानिक ग्रामस्थांना देखील सन्मान देण्याची गरज निर्माण झाली आहे साईबाबा संस्थान ची एकतर्फी भूमिका शहरातील अर्थकारणाला बाजारपेठेला फटका देणारी ठरत आहे साई भक्तांचे दर्शन आनंददायी झाले पाहिजे याबाबत दुमत नाही मात्र इतर बंद असलेले दरवाजे देखील उघडण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे शिर्डीच्या अर्थ करणाला मोठी मदत होणार आहे त्यासाठी साईबाबा संस्थांनने तात्काळ निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे त्यासाठी धोरणात्मक निर्णय होण्याची गरज आहे असे मत नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी व्यक्त केले
चर्चा करून प्रश्न सोडू बगाटे
शिर्डी ग्रामस्थानी समिती तयार करावी एकमेकांशी चर्चा करून मार्ग काढू लवकरच कोराणाचे नियम काही प्रमाणात शिथिल होणार आहे परिस्थिती लवकरच सुधारेल व नियम देखील शिथील होतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी 27 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले
0 Comments