आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ड्रेस कोड फलकाला भुमाता बिग्रेडने काळे फासले तीन जण शिर्डी पोलिसांनी घेतले ताब्यात

 ड्रेस कोड फलकाला भुमाता बिग्रेडने काळे फासले तीन जण शिर्डी पोलिसांनी घेतले ताब्यात





शिर्डी/किशोर पाटणी :-----  शिर्डी येथील साईबाबा संस्थान मंदिर प्रवेश करतेवेळी भारतीय पोशाख घालूनच मंदिरात मंदिरात प्रवेश करावा या फलकाला भुमाता बिग्रेडच्या दोन महिला व एक पुरुष यांनी  काळे फासले असून याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे अधिक माहिती अशी की मागील महिन्यात शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांनी मंदिरात प्रवेश करताना भारतीय वेशभूषा साजेशा ड्रेस परिधान करून मंदिरात प्रवेश करावा अशा प्रकारचे फलक साईबाबा संस्थांनी लावल्यानंतर  भुमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबर रोजी सदर फलक 31 डिसेंबर पर्यंत साईबाबा संस्थानने हटवावेत असा इशारा दिला होता यावरून शिर्डी शहरात मोठे वादळ पेटले होते या वादात शिवसेना-मनसे ब्राह्मण महासंघ यांनी शिर्डी शहरात तृप्ती देसाई यांना पाय ठेवू देणार नाही असा संतप्त इशारा दिला होता आव्हान दिले होते तृप्ती देसाई 31 डिसेंबर रोजी शिर्डी कडे येत असताना सुपा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना परत पुण्याला पाठवले होते गुरुवार दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पुणे येथील दोन महिला व एका पुरुषाने गेट नंबर एक समोरील साईबाबा संस्थांच्या फलकाला पदार्थ फेकून बोर्ड खराब करण्याचा प्रयत्न केला यावेळी साईबाबा संस्थांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रतिकार केला व शिर्डी पोलिसांना बोलावून त्यांना ताब्यात दिले याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी मीनाक्षी शिंदे राहणार सांगली मनीषा पुंजे  राहणार पुणे हर्षल पाटील राहणार पुणे याला ताब्यात घेतले असून साईबाबा संस्थांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते घडलेल्या या घटनेमुळे शिर्डी  परिसरात मोठी खळबळ उडाली आहे

Post a Comment

0 Comments