आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

तालुक्यातील २७९ ग्रामपंचायतीच्या जागासांठी ६११ उमेदवार रिंगणात ; तर ७ जागा बिनविरोध.

 तालुक्यातील २७९  ग्रामपंचायतीच्या  जागासांठी ६११ उमेदवार रिंगणात ; तर ७ जागा बिनविरोध.


निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांची माहिती.




कोपरगाव प्रतिनिधी :---- कोपरगांव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज माघारी प्रक्रीयेत उमेदवारी दाखल एकुण ९७५ अर्जा पैकी ११ अर्ज अवैध झाले असून एकूण शिल्लक ९६४ अर्जापैकी ६११ अंतिम उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.छाननी प्रकिया वेळी राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे उपस्थित होत्या.२३ डिसेंबर - राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आलेला आहे.

एकुण वैध अर्ज - ९६४

माघारी अर्ज - ३५३

अंतिम उमेदवार - ६११

एकुण जागा - २७९

बिनविरोध जागा - ०७

ग्रामपंचायत निवडणूक अर्ज माघारीचे अंतिम दिवशी जेऊरकुंभारी ग्रामपंचायत वार्ड  नं.३ अनुसूचित जमाती महिला राखीव मधून पवार सुवर्णा सतिष, सांगवी भुसार ग्रामपंचायत वार्ड नं.१ अनुसूचित जमाती माळी दिपक नामदेव, अनुसूचित जमाती महिला राखीव मधून माळी सुनंदा भास्कर,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव मधून शिंदे वंदना नानासाहेब, वार्ड नं.२ अनुसूचित जाती महिला राखीव मधून मेहरखांब लहानुबाई पुंडलिक,वार्ड नं.३ सर्वसाधारण मधून कासार मोहन अशोक, सर्वसाधारण महिला राखीव मधून जाधव पुष्पा बाबासाहेब या सर्व उमेदवाराच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज निर्धारित मुदतीत माघार घेतली आहे.त्या वरील सात उमेदवार बिनविरोध निवड झाली आहे.ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध प्रक्रिया सुरु झाली आहे.

मतदान शुक्रवार दि. १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत राहणार आहे.

  मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होईल. अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत .

Post a Comment

0 Comments