आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

टाकळी ते रवंदे अडीच किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर – आमदार आशुतोष काळे.

 टाकळी ते रवंदे अडीच किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर – आमदार आशुतोष काळे.





कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मागील पाच वर्षापासून रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा असून या  रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु असून त्या पाठपुराव्यातून (प्रजिमा ५) च्या टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व मजबुतीकरणासाठी नाबार्डकडून २ कोटी ५० लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.  

कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या (प्रजिमा ५) च्या टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या रवंदे, टाकळी च्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या अडीच किलोमीटर खराब रस्त्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्यामुळे रवंदे, टाकळी च्या नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार आशुतोष काळे यांना साकडे घातले होते. खराब रस्त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून आमदार आशुतोष काळे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु होता. मतदार संघातील खराब रस्त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटात देखील अनेक रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी आमदार आशुतोष काळे प्रयत्नशील असून त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत देखील मिळत आहे. त्यापैकी (प्रजिमा ५) वरील  टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण, मातीभराव, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, मुरुम बाजूपट्टी, कच्चे गटर्स, नवीन पाईप मोरीचे बांधकाम आदी कामांसाठी नाबार्ड कडून अडीच कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आली असून लवकरच या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरु होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

मागील पाच वर्षापासून या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून या रस्त्यासाठी निधी मिळविल्याबद्दल रवंदे, टाकळी च्या नागरिकांनी व या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी आमदार काळ यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments