Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

संदीप वर्पे यांच्या मागणीला यश. नगरपालिका बांधणार महिलांसाठी नवीन

 संदीप वर्पे यांच्या मागणीला यश.

  नगरपालिका बांधणार महिलांसाठी नवीन स्वच्छतागृहे.

कोपरगाव प्रतिनिधी -------  कोपरगाव शहर व उपनगरातील महिला व तसेच माधवराव आढाव येथील जुने सायन्स कॉलेज च्या लगत असलेल्या संरक्षक भिंती जवळ उर्दू शाळा क्रमांक चार व शिक्षण मंडळाच्या इतर शाळांत करिता महिला शिक्षिका व विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नगरपालिकेकडून बांधून मिळण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व कोपरगाव नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक संदीप वर्पे यांनी काही दिवसांपूर्वी वरील स्वच्छतागृह संदर्भात कोपरगाव नगरपालिकेला लेखी पत्र देऊन वरील सर्व  महिलांच्या निगडित असलेल्या स्वच्छतागृह संदर्भात विषय पालिकेच्या बांधकाम विभागाच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये विषय पत्रिकेत घ्यावा व त्याला मंजुरी मिळावी अशी मागणी केली होती त्यानुसार सोमवार 11 जानेवारी रोजी झालेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या  बांधकाम समितीच्या सभेमध्ये वरील विषय नंबर 6,7,8 याप्रमाणे विषय पत्रिकेत नमूद करण्यात आले होते व या विषयांना नगरपालिकेने मंजुरी दिली मंजुरी दिली असल्याची माहिती संदीप वर्पे यांनी दिली आहे तसेच ते म्हणाले की महिला शिक्षिका व विद्यार्थिनींसाठी व तसेच कामानिमित्त  खरेदीसाठी येणाऱ्या महिलांसाठी शहरांमध्ये कुठेही असे स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत होती तसेच बरेच दिवसांपासून ही मागणी देखील होती त्यानुसार विषयाचे गांभीर्य लक्षात घेत पालिकेने देखील स्वच्छतागृहाच्या कामाला मंजुरी दिल्याने महिलांची कुचंबणा आता होणार नाही तसेच हे काम पालिकेने लवकरात लवकर प्राधान्याने करावे अशी मागणी ही संदीप वर्पे यांनी केली आहे.   

Post a Comment

0 Comments