आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शिर्डीत जागतिक दर्जाचे कॅन्सर हाॅस्पिटल व २५कोटी खर्चाची गोशाळा सुरू करणार---- मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची माहिती

शिर्डीत जागतिक दर्जाचे कॅन्सर हाॅस्पिटल  व २५कोटी खर्चाची गोशाळा सुरू करणार----

मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची माहिती

शिर्डी प्रतिनिधी:--------      शिर्डी शहरात साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रलंबित असलेले विविध प्रकल्प याबरोबर चांगल्या दर्जाचे कॅन्सर हॉस्पिटल बरोबरच भव्य अशी  गोशाळा उभी करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिर्डी येथील साईबाबा संस्थान आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात कार्यकारी अधिकारी कान्हुराज बंगाटे  यांनी दिली यावेळी साईबाबा संस्थान चे विविध अधिकारी उपस्थित होते  यावेळी  पत्रकार दिनानिमित्त   शिर्डी परीसरात काम करणाऱ्या पत्रकारांचा गुलाबपुष्प देउन सत्कार करण्यात आला


 मुख्यकार्यकारी अधिकारी बगाटे म्हणाले की साईबाबा संस्थान  वर्षाकाठी २८ कोटी रुपये तूप तर पाच कोटी रुपयाचे दुध चहा काॅफी साठी व लाडु तयार करण्यासाठी तर उदीसाठी १५लाख रुपयच्या गोवरी खरेदी  करण्यासाठी खर्च येतो त्यामुळे लगतच्या  काळात  एक गाय एक भक्त या धर्तीवर पाच हजार  गायींची भव्य अशी गोशाळा उभी करण्यात येणार असून  हा जवळपास पंचवीस कोटी रुपयांचा प्रकल्प असणार आहे त्यातून दूध आणि तूप साईबाबा संस्थांनला  उपलब्ध होईल याबरोबर याठिकाणी जातिवंत गाईची  खरेदी करण्यात येणार आहे ही संकल्पना लोकसहभागातून राबवण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाच्या यशदा  शी संपर्क साधला जाणार आहे या अगोदर कधी केंद्र सरकारच्या योजनेतून पार्कींग किंवा दर्शनरांग भक्तनिवास यासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करण्यात आला नव्हता आता त्यासाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे यासाठी प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले त्याबरोबरच शिर्डी  गावकऱ्यांना चांगल्या पद्धतीने साई चे दर्शन सुलभ झाले पाहिजे यासाठीदेखील स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी विचार सुरू असून शिर्डीतील बाजारपेठेत अर्थकारण वाढले पाहिजे यासाठी संस्थांनचा प्रयत्न असून त्यासाठी सकारात्मक पद्धतीने साईबाबा संस्थान प्रयत्न करीत आहे साईबाबा संस्थान चा लगत असलेल्या विविध असलेले तीर्थक्षेत्र एकमेकांना जोडून शिर्डीत आलेल्या साई भक्तांना त्या त्या तीर्थक्षेत्राचे सुद्धा दर्शन झाले पाहिजे यासाठी माफक दरात वाहतूक व्यवस्था कशी उभी करता येईल यासाठीसुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणच्या बाजारपेठेला मोठा फायदा होणार असल्याने साईभक्तांचे शोषण होणार नाही याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून साईबाबा संस्थान चे प्रलंबित  प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच फक्त  शिर्डी शहरात दोन-चार दिवस कसा थांबेल यासाठीदेखील साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल असे सांगून पत्रकारांच्या सकारात्मक सूचनाही साईबाबा संस्थान विचारात घेईल असे सांगून सगळ्यांना बरोबर घेऊन एक विचारातून चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहील असे सांगितले

 

Post a Comment

0 Comments