कोल्हे गटाने केवळ श्रेयवाद डोक्यात ठेवूनच विकासकामांत अडथळे आणले आहेत.----- नगराध्यक्ष विजय वहाडणे.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :------ आमदार पदाचा गैरवापर करून तीन वर्षे नगरपरिषदेला निधी मिळू न देता विकास कामात खोडा घालणारे आता मीच विकास कामात खोडा घालत असल्याचा खोटा आरोप करत आहेत. वास्तविक पाहता माजी आमदार कोल्हे यांचा विधानसभा निवडणुकीतील पराभव, नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव, पंचायत समिती तील पराभव अशा बहुतांश ठिकाणच्या सत्ता गेल्याने असंतुष्ट आत्मे आपल्या नगरसेवकांच्या मार्फत शहर विकासामध्ये खोडा घालण्याचे काम करत आहे अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शनिवारी पालिकेच्या दालनात झालेल्या आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले पालिकेत नुकतीच स्थाई समितीची मीटिंग झाली या मिटिंग मध्ये मीटिंग सुरू असताना संजीवनीचे दोन दूत दरवाज्याबाहेर उभे होते. त्यांना ऐकू जावे म्हणून बालिश उपनगराध्यक्ष मोठ- मोठ्याने ओरडत होते. मी नगराध्यक्ष झाल्यापासून चार वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासाची कामे केली आहे. कोपरगाव शहरासाठी आलेला निधी हा फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवण्यासाठी नसून शहर विकासासाठी आहे. याआधीच्या मुख्य अधिकाऱ्यावर दबाव असल्याने त्याकाळात आत्ताचे मुख्याधिकारी यायच्या आधी 2018 मध्ये सहा कोटी रुपये न वापरल्याने शासनाकडे परत गेले. याला जबाबदार कोण? फिक्स मधील पैसे प्रभागातील विकास कामांसाठी वापरले आहे. शहरातील महत्त्वाचे रस्ते करण्याच्या कामात कोल्हे गटाने केवळ श्रेयवाद डोक्यात ठेवूनच अडथळे आणले आहेत. स्थाई समितीच्या मिटींग मधील विषय का नामंजूर करायचे याचे उत्तरही सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना देता आले नाही. केवळ संजीवनी नीच्या गडावरून आदेश आल्याने भाजपा नगरसेवकांनी विषय नामंजूर केले. येवला व संगमनेर व बाहेरील प्रतिष्ठित ठेकेदारांच्या निविदा मंजूर होण्याची शक्यता असल्याने कोल्हे गटाचे नगरसेवक आपल्या हाताखालच्या ठेकेदारांना ही कामे मिळाले नाहीत व मलिदा मिळणार नाही म्हणून अस्वस्थ आहेत. आजही 95 टक्के पेक्षा जास्त ठेकेदार कोल्हे यांच्या जवळचे आहेत. कोपरगाव नगरपरिषद शहरात स्वच्छता ठेवते की नाही हे जनतेला माहीत आहे. यापूर्वी फक्त तिजोरी साफ व्हायची पण आता शहर स्वच्छ होते हे सर्वांना दिसत आहे. माझ्यावर आरोप करणारे काहीजण मला खाजगीत भेटून सांगतात की आमचे तुमच्या बद्दल काहीच म्हणणे नाही फक्त पार्टीचा आदेश म्हणून नाईलाजाने बोलावे लागते. अतिक्रमण करणारे त्यांना पाठीशी घालणारे ,अनेक वर्षे नगरपरिषदेत लूट करणारे, विस्थापितांना वेड्यात काढणारे, ठेकेदाराला पुढे करून पडद्याआडून काम करणारे, ठरावीक ठेकेदाराला काम द्या असा आग्रह धरणारे, पाणी योजनेच्या ठेकेदाराला सतत पैशांची मागणी करणारे, हातगाड्या फेरीवाल्यांकडून हप्ते घेणारे, पूर्वी 23 दिवसाड पाणी देणारेच आज माझ्यावर आरोप करत आहेत. बहुतांश ठेकेदार कोल्हे यांचेच आहेत यांना विचारून बघा शहरात विकास झाला की नाही . आसेही नगराध्यक्ष वहाडणे शेवटी म्हणाले.
कोपरगाव एका महिन्यात धुळ मुक्त होऊ शकते असे सोशल मीडियाद्वारे गप्पा मारणारे यांनी आपणही आपल्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये अध्यक्षपदाच्या खुर्चीची उब घेतली आहे. त्यावेळी का नाही कोपरगाव धुळ मुक्त झाले असा टोला नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे नाव न घेता लगावला.
0 Comments