आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

विकासकामांच्या निविदा नामंजूर कोपरगावात सर्वपक्षीयांच्या वतीने काढली जनजागृती फेरी.

 विकासकामांच्या निविदा नामंजूर कोपरगावात सर्वपक्षीयांच्या वतीने काढली जनजागृती फेरी.

कोपरगाव प्रतिनिधी :------  कोपरगाव शहरातील विकासकामांच्या निविदा कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी नामंजूर केल्यामुळे शहर विकासाचा झालेला खोळंबा तमाम शहरातील नागरिकांच्या निदर्शनास आणून देऊन कोल्हे गटाचे नगरसेवक विकासाच्या बाबतीत किती उदासीन आहेत हे दाखवून देण्यासाठी शनिवार (दि.१६) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसशिवसेनाराष्ट्रीय कॉंग्रेस,मनसे व आदी मित्र पक्षांच्या वतीने कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यावरून जनजागृती फेरी काढण्यात आली.

कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत कोपरगाव शहरातील विविध विकास कामांच्या निविदा सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केल्या आहे. त्यामुळे या विकासकामाचा कोपरगाव शहरातील ज्या हजारो नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा झाला असता तो आता होणार नाही. सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकास न करण्याची वृत्ती जोपासून शहरातील नागरिकांवर अन्याय केला आहे. याची माहिती शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या सर्वपक्षीय जनजागृती फेरीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी शहर विकासात घातलेल्या आडकाठीमुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असल्याच्या भावना नागरिकांनी या जनजागृती फेरी दरम्यान व्यक्त केल्या आहे.

या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पेशहराध्यक्ष सुनील गंगूलेशिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियालयुवक शहराध्यक्ष नवाज कुरेशीनगरसेवक गटनेते वीरेन बोरावकेमंदार पहाडेसंदीप पगारेसौ. प्रतिभाताई शिलेदारहाजी मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदारराजेंद्र वाकचौरेफकीरमामु कुरेशी,रमेश गवळीभरत मोरेदिनकर खरेराहुल देवळालीकरवाल्मिक लहिरेसंदीप देवळालीकररावसाहेब साठेसंदीप कपिले,अशोक आव्हाटेगणेश लकारेराजेंद्र खैरनार,चंद्रशेखर म्हस्केबाळू सोळुंकेराजेंद्र जोशी,एकनाथ गंगूलेविशाल चवंडकेविजय दाभाडेइम्तियाज अत्तारविजय नागरेसौ. रश्मीताई कडूसौ. सारिका मोरस्करलक्ष्मण आमलेसमीर वर्पेऋषिकेश खैरनारनारायण लांडगेकार्तिक सरदारसंतोष शेजवळविकी जोशीतेजस साबळेसंतोष दळवी, विकास शर्माराहुल चवंडकेरशीद शेखशफीक शेख,स्वप्नील घुगरे,  अशोक लांडगेआकाश डागा,सजीत शेखआकाश कानडे, रवींद्र राऊत,योगेश नरोडेदादा पोटेहर्षल जैस्वालरोशन शेजवळयुसूफ शेखपप्पु सय्यदसरजिल शेखवसीम शेखअरबाज सय्यद, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments