आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अयोध्या राम मंदिरासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे- महंत शिवानंदगिरी महाराज.

 अयोध्या राम मंदिरासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे- महंत शिवानंदगिरी महाराज.

 राममंदिर निर्माण निधी संकलन अभियान कार्यालयाचे कोपरगावात संत महंतांच्या हस्ते उदघाटन.

 




कोपरगाव प्रतिनिधी :----  सुप्रीम कोर्टाने अयोध्या श्रीराम मंदिराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये भव्यदिव्य मंदिर साकारले जात असून त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचा हातभार लागावा या हेतूने प्रत्येक घरातून किमान 10 रुपये संकलन करण्याचा निश्चय श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या या समितीने घेतला.


त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत संपर्क करून निधी संकलन करण्याचे अभियान आज कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात सुरु झाले. या अभियानाच्या नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी जोशी कॉम्प्लेक्स, कापड बाजार, कोपरगाव याठिकाणी कार्यालयाचा शुभारंभ  महंत शिवानंदगिरीजी महाराज, महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज, अभियानाचे मोठा निधी जिल्हा प्रमुख, माजी आमदार चंद्रशेखर जी कदम, माजी आमदार सौ स्नेहालताताई कोल्हे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, मनसे जिल्हा उपप्रमुख संतोष गंगवाल, अभियानाचे तालुका प्रमुख योगेश पगारे, अनेक कारसेवक व मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.

भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरुगोविंद सिंग हे धर्मासाठी क्रांतिकारक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. प्रत्येक घरातून किमान 10 रुपये हि संकल्पना धर्म जोपासण्यासाठी महत्वाची आहे. धनाढ्य लोक लागेल तेवढे धन द्यायला तयार आहेत परंतु हे राममंदिर राष्ट्रमंदिर असून त्याच्या उभारणीत प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने भरघोस निधी या राष्ट्रमंदिरसाठी द्यावा असे आवाहन या वेळी महाराजांनी केले.

महंत राघवेश्वरानंदगिरी महाराजांनी यावेळी नमूद केले की कोपरगाव हि संत जनार्दन स्वामी, पूज्य जंगली महाराज, पूज्य रामदासी महाराज यांसारख्या थोर संतांची भूमी आहे. श्रीरामांच्या वनवास काळात त्यांचा पावनस्पर्श या भूमी ला झालेला आहे त्यामुळे आपण सर्व जण मोठे भाग्यवान आहोत.

राहुरीचे माजी आमदार श्री चंद्रशेखर कदम यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना सर्वांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या या  कार्यात स्वतःला जोडून घेत उत्साहाने काम करावे असे प्रतिपादन केले.

Post a Comment

0 Comments