आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदार आशुतोष काळेंच्या पुढाकारातून ऊस वाहतूक वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर.

 आमदार आशुतोष काळेंच्या पुढाकारातून ऊस वाहतूक वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर.




कोपरगांव प्रतिनिधी:------- रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे पुढाकारातून कारखाना कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वतीने रेडियम रिफ्लेक्टर वाटप करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.

            रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत नुकतेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर  कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे जनरल मॅनेजर सोपानराव डांगे, संचालक ज्ञानेश्वर हाळनोर, सुरेगावचे पोलीस पाटील संजय वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जनरल मॅनेजर सुनील कोल्हे म्हणाले कि, सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी सुरक्षा सप्ताहाचे नियम पाळून पोलीस प्रशासनाच्या व आर.टी.ओ. विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे यामध्ये वाहन धारक  व कारखान्याचे हित जोपासले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी ऊस वाहतूक वाहन धारकांना मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले कि, ऊस वाहतूक करतांना वाहन धारकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. व्यसन करून वाहन चालविताना यदाकदाचित अपघात झाल्यास आपल्या चुकीची अनेक कुटुंबांना शिक्षा भोगावी लागते याचे भान आपण जपले पाहिजे. तसेच काही वाहन चालकांना वाहन चालवितांना मोबाइलवर बोलणे व मोठ्या कर्कश आवाजात गाणी ऐकण्याची सवय असते त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात घडत असतात. त्यामुळे वाहन धारकांनी अशा चुकीच्या सवयी बंद केल्यास निश्चितपणे अपघात कमी होतील. असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, टायर बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर जुगाड अशा एकूण ८७३ वाहनांना गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वतीने रेडियम रिफ्लेक्टर बसविण्यात आले. यावेळी उपस्थितांचे गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे जनरल मॅनेजर सोपानराव डांगे यांनी आभार मानले.  

Post a Comment

0 Comments