कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे पुढील पाच वर्षांंसाठी सरपंच पद आरक्षण प्रक्रीया संपन्न.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :------ कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे सन २०२० ते २०२५ या कालावधीकरिता सरपंचपद आरक्षण प्रक्रीया उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार योगेश चंद्रे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . सुरुवातीला कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या गत २५ वर्षातील आरक्षण उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांना निदर्शनास आणून दिले.त्या नंतर निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्त्वानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण,अनुसूचित जाती स्री राखीव,अनुसूचित जमाती स्री राखीव,नागरीकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण स्री राखीव या प्रमाणे आरक्षण सोडत करण्यात आली.
आरक्षण सोडत मध्ये चिठ्ठी पध्दतीचा अवलंब करण्यात आला.यात शर्विल कुणाल बाविस्कर या सहा वर्षाच्या मुलाचे हस्ते सोडत चिठ्ठी काढण्यात आल्या आहेत.कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायत पैकी ३८ ग्रामपंचायत मध्ये स्रीयांना सोडत निहाय आरक्षण लागू झाले आहे.यात अनुसूचित जाती ०५, अनुसूचित जमाती ०६, नागरिकांचा मागास प्रवर्ग १०, खुला प्रवर्ग १७ अशा एकूण ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच पद स्रीयांना सोडतीत मिळाले आहे.कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी लागू आरक्षण व ग्रामपंचायत खालील प्रमाणे -
अनुसूचित जाती राखीव -
शिंगणापूर, मंजूर,माहेगांव देवी,डाऊच बुद्रुक,कारवाडी
अनुसूचित जाती स्री राखीव -
तिळवणी,माहेगांव देशमुख,कोकमठाण,चासनळी,मढी खुर्द
अनुसूचित जमाती -
रवंदे,कासली, दहेगांव बोलका, जेऊर-कुंभारी,कान्हेगांव
अनुसूचित जमाती स्री राखीव-
देर्डे-कोर्हाळे, शहाजापूर, पोहेगांव बुद्रुक-पोहेगांव खुर्द,ओगदी,वेस-सोयगाव,येसगांव
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.म.प्र.) -
सांगवीभुसार,कोळगाव थंडी,हंडेवाडी,करंजी बुद्रुक,अंचलगांव,मुर्शतपुर,लौकी,देर्डे-चांदवड,मनेगांव,चांदेकसारे
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.म.प्र.) स्रीयांकरिता राखीव -
मोर्विस,कोळपेवाडी,चांदगव्हाण, आपेगाव,गोधेगांव,घोयेगांव,सडे,डाऊच खुर्द, शहापूर, रांजणगाव देशमुख
सर्वसाधारण -
धामोरी,ब्राम्हणगांव, टाकळी,मढी बुद्रुक,बहादरपुर,घारी, काकडी-मल्हारवाडी, वडगांव,नाटेगांव, धोत्रे,धोंडेवाडी,सोनारी,हिंगणी,खिर्डी गणेश, शिरसगाव-सावळगांव,भोजडे,बोलकी
सर्वसाधारण स्री राखीव -
मळेगांव थडी, कुंभारी, सुरेगांव, वेळापूर,बक्तरपुर,धारणगांव,जेऊर पाटोदा,उक्कडगांव,पढेगांव, तळेगाव मळे,वारी,खोपडी,सोनेवाडी,बहादराबाद,जवळके,संवत्सरअंजनापूर या प्रमाणे सरपंच पद आरक्षण सोडत झाली आहे .सदर प्रक्रीया सुलभतेने हाताळण्यासाठी तहसिल कार्यालय निवडणूक शाखेचे अरुण रणनवरे यांचे सह कर्मचारी उपस्थित होते. सरपंच पद सोडतीची प्रक्रीया पारदर्शक पणे होणेकरिता या सोडतीचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर उपस्थित.ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांसाठी करण्यात आले होते. यावेळी कोपरगांव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments